IPL 2023 GT vs MI Live Streaming | गुजरात विरुद्ध मुंबई प्रतिष्ठेचा सामना, रोहित कृणालनंतर हार्दिकवर वरचढ ठरणार?
Gujarat Titans vs Mumbai Indians Live Streaming | मुंबई आणि गुजरात दोन्ही संघ या 16 व्या मोसमात एकूण 2 वेळा भिडले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई आणि गुजरातने प्रत्येकी 1-1 मॅच जिंकली आहे.

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमातील क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहचेल आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळेल. मुंबईचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे गुजरात टायटन्सची जबाबदारी आहे. मुंबईने एलिमिनेटरमध्ये कृणाल पंड्या याच्या लखनऊ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवत क्वालिफायर 2 मध्ये धडक दिली. तर क्वालिफायर 1 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने पराभूत केलं. आता गुजरातला अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी आणखी एक संधी आहे. त्यामुळे क्वालिफायर 2 मध्ये कोण पोहचणार याबाबत क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या निमित्ताने आपण या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
गुजरात विरुद्ध मुंबई क्वालिफायर 2 मॅच केव्हा?
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील क्वालिफायर 2 मॅच शुक्रवारी 26 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
सामना कुठे खेळवण्यात येणार?
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघता येणार?
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना हा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेलवर पाहता येणार आहे.
डिजीटल स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना लॅपटॉप आणि मोबाईलवर जिओ एपच्या माध्यमातून पाहता येईल.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर.
गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.