RR vs GT : गुजरात टायटन्सने रॉयल्सला रोखलं, जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान!

आरआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांच्यावरच उलटा पडल्याचं दिसत आहे.

RR vs GT : गुजरात टायटन्सने रॉयल्सला रोखलं, जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान!
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 9:45 PM

मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यामध्ये रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर रोखलं आहे. आरआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचा डाव 118 धावांवर गुंडाळला. संघाच्या टॉप ऑर्डरने गुजरातच्य गोलंदाजांसमोर नांगी टाकली. गुजरातला पहिलं स्थान भक्कम करण्यासाठी हा सामना जिंकावा लागणार आहे.

राजस्थान संघाची सुरूवात एकदम खराब झाली. जोस बटलर 9 धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या कर्णधार संजू सॅमसन याने आक्रमक फलंदाजी केली. यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन दोघांमध्ये मोठी भागीदारी होईल असं वाटलं होतं. मात्र चुकीच्या कॉलमुळे जयस्वाल रनआऊट झाला.

जयस्वाल आऊट झाल्यानंतरही संजूने आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता. पंरतू संजू कट करण्याच्या प्रयत्नात जोशुआ लिटलच्या गोलंदाजीवर कॅचआऊट झाला. संजू आऊट झाल्यानंतर राजस्थानचा डाव पत्त्यासारखा कोसळताना दिसला.

देवदत्त पडिक्कल 12 धावा, शिमरॉन हेटमायर 7 धावा, ध्रुव जुरेल 9 धावा, रविचंद्रन अश्विन 2 धावा करून आऊट झाले. शेवटला फलंदाजीला आलेल्या ट्रेंट बोल्टने (15 धावा) एक सिक्स आणि एक फोर मारत संघाला 110 धावांचा टप्पा पार करून दिला. गुजरातकडून नूर अहमदने सर्वाधिक 3, राशिद खान 2 आणि मोहम्मद शमीनेही 2 विकेट्स घेतल्या.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा, हार्दिक पांड्या (c), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.