IPL 2023 : कोट्यवधींच्या खेळाडूला लपवून खेळवण्याची राजस्थान रॉयल्सवर वेळ? आता दाखवणार बाहेरचा रस्ता!
IPL 203 GT vs RR : आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सला मागच्या सामन्यात पराभूत करत राजस्थानने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. असं असलं तरी टीम मॅनेजमेंट रडावर आहे. कारण की...
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघ जबरदस्त फॉर्मात आहे असंच म्हणावं लागेल. राजस्थान रॉयल्सने पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. त्याचबरोबर गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. गुजरात विरुद्धच्या सामन्यात तर जबरदस्त कामगिरी करत त्यांना 3 विकेट्सनं पराभवाची धूळ चारली. पण असलं तरी राजस्थान रॉयल्सची टीम मॅनेजमेंट निशाण्यावर आहे. त्याला एक खेळाडू जबाबदार आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून रियान पराग आहे. गेल्या काही सामन्यांपासून त्याचं खराब प्रदर्शन सुरुच आहे.
रियान परागने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात 7 चेंडूत फक्त 5 धावा केल्या. परागने 11 व्या षटकात राशिद खानच्या गोलंदाजीवर खराब फटका मारून बाद झाला. त्यामुळे राजस्थान संघाची धाकधूक वाढली होती. पण संजू सॅमसन आणि शिमरन हेटमायर यांनी हा सामना खेचून आणला.
नेटकऱ्यांच्या निशाण्यावर टीम मॅनेजमेंट
रियान पराग 2019 पासून राजस्थान संघासोबत आहे. पण एकाही हंगामात चांगली कामगिरी करू शकला नाही. असं असूनही तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवत आहे. रियान पराग गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात आउट झाल्यानंतर नेटकऱ्यांनी टीम मॅनेजमेंटवर निशाणा साधला आहे. खराब प्रदर्शन करूनही संघात स्थान का दिलं जात आहे? असा प्रश्न विचारला जात आहे.
Just Riyan Parag things✨#RRvsGT pic.twitter.com/opGLPOa0TI
— Abisek (@mayyena) April 16, 2023
रियान परागची आयपीएल कारकिर्द
रियान परागची आकडेवारी खूपच खराब आहे. मागच्या 41 डावात रियानने 16.03 च्या सरासरीने 561 धावा केल्या आहेत. रियानचा स्ट्राईक रेट 123.57 आहे. तर गोलंदाजीत 10 रन प्रति ओव्हर पेक्षा जास्त आहे. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी रियान पुरेशी कामगिरी करु शकलेला नाही.
2019- He is a Kid and he's learning. 2020- He is a Kid and he's learning.2021- He is a Kid and he's learning.2022- He is a Kid and he's learning.2023- He is a Kid and he's learning2040- He is a Kid and he's still learning.Lord Riyan Parag pic.twitter.com/WnunyQ0dpZ
— StrawHat Luffy (@PirateKing200) April 16, 2023
रियान परागची कामगिरी पाहता नेटकऱ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान का दिलं जात आहे. तसेचं त्याला 3.80 कोटी देण्यामागचं कारण काय? असा प्रश्नही विचारत आहेत. त्याच्या जागी ध्रुव जुरेलला संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. आयपीएल डेब्युतच त्याने चांगली कामगिरी केली होती.
आयपीएल सुरु होण्यापूर्वी रियानने एक ट्वीट करत लिहिलं होतं की , त्याल असं वाटतं की तो एका षटकात चार षटकार ठोकेल. पण रियाजने चार सामन्यात फक्त 4 चौकार ठोकले आहे. चार सामन्यात 9.75 च्या सरासरीने 39 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 108.33 आहे.
राजस्थानचा पूर्ण स्क्वॉड : संजू सॅमसन, यशस्वी जायसवाल, शिमरन हेटमायर, दीपक पडिक्कल, जॉस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, ओबेड मॅकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल, केसी करियप्पा, जेसन होल्डर, जेसन होल्डर, एडम झम्पा, जो रूट, डोनोवन फरेरा, केएस आसिफ,अब्दुल पीए, आकाश वशिष्ट,कुणाल राठौर आणि मुरुगन अश्विन.