RR vs CSK : राजस्थान रॉयल्सकडून चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये रॉयल्सने 30 धावांनी 'सुपर' विजय मिळवला आहे. चेन्नईकडून शिवम दुबेने केलेली 53 धावांची अर्धशतकी खेळी वाया गेली.  

RR vs CSK : राजस्थान रॉयल्सकडून चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 1:03 AM

मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये रॉयल्सने 30 धावांनी ‘सुपर’ विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाने 202 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाला निर्धारित 20 षटकात 170 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून शिवम दुबेने केलेली 53 धावांची अर्धशतकी खेळी वाया गेली.

सीएसके संघाने सावध सुरूवात केली होती. सलामीवीर ऋुतुराज गायकवाड 47 धावा आणि डेवॉन कॉनवे 8 धावा करून बाद झाले. सीएसकेला पॉवर प्लेमध्ये 42 धावाच करता आल्या. त्यानंतर अजिंक्य रहाणे15 धावा, मोइन अली 23 धावा, अंबाती रायडू 0 धावा करून बाद झाले.

सुरूवातीच्या खेळाडूंनी आक्रमकपणे बॅटींग केली नाही. याचा फटका सीएसके संघाला बसला. आवश्कक रन रेट वाढल्याने मोठा फटका खेळण्याच्या नादात खेळाडू  बाद होते  गेले. शिवम दुबेने 33 चेंडूत 52 धावा करत आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र राजस्थानच्या गोलंदाजांच्या कमाल कामगिरीच्या जोरावर त्यांनी सीएसकेसारख्या संघाला 170 धावांवर रोखत विजय मिळवला.

राजस्थानची बॅटींग

चेन्नईने जोस बटलर 27 धावा , संजू सॅमसन 17 धावा, शिमरन हेटमायर 8 धावा यांना मोठी  खेळी करू दिली नाही. मात्र यशस्वी जयस्वाल 77 धावा आणि ध्रुव जुरेल 34 आणि पडिक्कलनेही नाबाद 27 धावा करत संघाला 200 धावांचा टप्पा पार करून दिला.

राजस्थान रॉयल्स संघाचे महत्त्वाचे खेळाडू बाद झाल्यावर संघ 170 धावा करण्यातही यशस्वी ठरतील की नाही शंका होती. मात्र आधी जयस्वाल त्यानंतर ध्रुव जुरेल आणि पडिक्कल यांनी चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. पडिक्कलनेही शेवटला येत आक्रमक फटकेबाजी करत संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली.

आयपीएल-2023 मध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे. यावेळी त्यांच्या घरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळताना राजस्थानने चेन्नईचा 32 धावांनी पराभव केला. यापूर्वी हे दोन्ही संघ चेपॉकमध्ये भिडले होते आणि त्या सामन्यातही चेन्नईचा पराभव झाला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने पाच गडी गमावून 202 धावा केल्या. चेन्नईला सहा गडी गमावत 170 धावाच करता आल्या. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 77 धावा केल्या. चेन्नईकडून शिवम दुबे याने सर्वाधिक 52 धावा केल्या.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेवन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सैमसन (w/c), शिमरोन हेटमेयर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, एडम ज़म्पा, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल

चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेवन): ऋुतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोइन अली, अंबाती रायडू, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कप्तान), मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.