VIDEO : IPL 2023 मधील शानदार कॅच चुकवू नका, राशिद खानमध्ये दिसली चित्याची चपळाई, कोहली सुद्धा हैराण!
सामन्यातील एक कॅच सोशल मीडियावर होताना दिसत आहे. क्रिकेट चाहते सोडाच विराट कोहलीसुद्धा हा कॅच पाहून थक्क झाला आहे. करामती खान म्हणून ओळखला जाणारा राशिद खान याने हा कॅच घेतला.
मुंबई : गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये गुजरात संघाने विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 227 धावांचा डोंगर उभा केला. भलीमोठी धावसंख्या उभारताना गुजरातचे दोन खेळाडू शिल्पकार ठरले. शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर गुजरातने 200 धावांचा टप्पा ओलांडला. या सामन्यातील एक कॅच सोशल मीडियावर होताना दिसत आहे. क्रिकेट चाहते सोडाच विराट कोहलीसुद्धा हा कॅच पाहून थक्क झाला आहे. करामती खान म्हणून ओळखला जाणारा राशिद खान याने हा कॅच घेतला.
पाहा व्हिडीओ –
Exceptional grab ?
The @gujarat_titans needed a special effort to break the opening partnership & @rashidkhan_19 does exactly that ?#TATAIPL | #GTvLSG pic.twitter.com/ldRQ5OUae8
— IndianPremierLeague (@IPL) May 7, 2023
या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ संघानेही धमाकेदार सुरूवात केली होती. कायले मेयर्स आणि क्विंटन डिकॉक यांनी चालू हंगामातील पहिला सामना खेळताना पहिल्या विकेटसाठी 50 चेंडूत 88 धावांची भागीदारी केली. मात्र, ही भागीदारी तोडण्यात राशिद खानचा मोठा हात होता.
नऊव्या ओव्हरमध्ये मोहित शर्माचा दुसरा चेंडूवर ऑफ स्टंपच्या बाहेर जात होता. यावर कायले मेयर्सने शॉट मारला पण चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला हवेत गेला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने राशिद खाव धावत आला. पठ्ठ्याचा थोडा अंदाज चुकला पण त्याने कॅच काही सोडला नाही. या विकेटनंतर गुजरात संघाने कमबॅक केलं. कारण मेयर्स आणखी 5 ओव्हर जरी मैदानावर थांबला असता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा असू शकला असता.
राशिद खान याचा हा कॅच पाहून विराट कोहलीसुद्धा थक्क झाला. कोहलीने इन्स्टावर स्टोरी टाकत, मी आतापर्यंत जेवढे कॅच पाहिले आहेत. त्यातील हा एक उत्तम झेल असल्याचं म्हटलं आहे. कोहलीने वृद्धिमान साहाच्या बॅटींगचं कौतुक करत त्याचीही स्टोरी टाकली आहे.
दरम्यान, लखनऊ संघाचा 56 धावांनी गुजरात संघाने पराभव करत गुणतालिकेमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. शुबमन गिल नाबाद (94), वृद्धीमान साहा (81) आणि गोलंदाज मोहित शर्माच्या 4 विकेटस हे खेळाडू गुजरातच्या विजयाचे हिरो ठरले. गुजरातने विजयासाठी 228 धावांच टार्गेट दिलं होतं. लखनऊला 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 171 धावाच केल्या.