W,W,W | करामती राशिद खान याचा जलवा, एकाच ओव्हरमध्ये लागोपाठ विकेट घेत पलटणला ढकललं बॅकफूटवर!
राशिद खानने एकट्याने मुंबईच्या बॅटींगला खिंडार पाडलं. रोहित शर्मा, ईशान किशन, नेहल वढेरा आणि टीम डेव्हिड यांनाही आऊट करत 4 विकेट मिळवत पर्पल कॅप मिळवली आहे.
मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात करामती राशिद खाने याने मुंबईल धक्के देत बॅकफूटला ढकललं आहे. गुजरात संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईकडून ईशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी आक्रमक सुरूवात केली होती. खास करून फॉर्ममध्ये नसलेल्या रोहित शर्माने आज कडक बॅटींग केली.
ईशान किशन आणि रोहित शर्मा यांनी पॉवर प्लेमध्ये बिनबाद 61 धावा केल्या. यामध्ये रोहितने 17 चेंडूत 29 धावा तर ईशान किशनने 19 चेंडूत 31 धावा केल्या होत्या. मात्र पॉवर प्लेनंतर राशिद खान याने सातवी ओव्हर टाकताना मुंबईला लागोपाठ धक्के दिले.
पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला राशिद खानने आऊट केलं आहे. 29 धावा करून रोहित आऊट झाला होता. आयपीएलमध्ये चौथ्यांदा राशिदने त्याला आऊट केलं आहे. त्याच ओव्हरमध्ये आक्रमक ईशान किशनलाही राशिदने आऊट करत मुंबईला दोन धक्के दिले आहेत. ईशान किशन 31 धावा करून आऊट झाला. राशिद खानने नेहल वढेरा आणि टीम डेव्हिड यांनाही आऊट करत 4 विकेट मिळवत पर्पल कॅप मिळवली आहे.
पाहा व्हिडीओ-
Rohit Sharma ✅ Ishan Kishan ✅@rashidkhan_19 dismissed both #MI openers in the same over
Follow the Match: https://t.co/o61rmJWtC5#TATAIPL | #MIvGT | @gujarat_titans pic.twitter.com/iW2PX7Q9fA
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग 11
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पांड्या (C), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (W), रोहित शर्मा (C), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय