Virat Kohli | आरसीबीची कॅप्टन्सी पुन्हा विराट कोहली याच्याकडे, टीम मॅनेजमेंटचा मोठा निर्णय
PBKS vs RCB IPL 2023 | पंजाब विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सूत्र विराट कोहलीच्या हाती सोपवण्यात आली आहेत. फाफ प्लेइंग इलेव्हनमध्ये असूनही असा निर्णय का घेतला असा प्रश्न पडला आहे.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची स्थिती खराब आहे. सुरुवातीचा सामना जिंकल्यानंतर बंगळुरुच्या संघात घसरण पाहायला मिळाली आहे. . आरसीबी या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या पाच पैकी 2 सामन्यात विजय, तर 3 सामन्यात पराभव सहन केला आहे. त्यात फाफच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा बोटं दाखवली जात आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात आरसीबीची सूत्र विराट कोहलीकडे सोपण्यात आली आहेत. प्लेइंग इलेव्हनमध्ये फाफ डू प्लेसिस असूनही असा निर्णय का घेतला? असा प्रश्न क्रीडा प्रेमींना पडला आहे. पण याचं उत्तर खुद्द विराट कोहलीने नाणेफेकीनंतर दिलं.
नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर विराट कोहलीने सूत्र हाती घेण्यामागचं कारण सांगितलं. “फाफ आज क्षेत्ररक्षण करू शकत नाही, त्यामुळे तो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळेल, वैशाकसोबत बदल असेल. नाणेफेक जिंकली असती तर प्रथम फलंदाजी केली असती, खेळपट्टी संथ होऊ शकते.”, असं विराट कोहलीने सांगितलं.
BREAKING: Toss with a twist! King Kohli to lead RCB today as @faf1307 is nursing an injury he picked up in the last match.#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #PBKSvRCB @imVkohli pic.twitter.com/vCVhJPhlhk
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 20, 2023
फाफ डु प्लेसिला मागच्या सामन्यात दुखापत झाली होती. यामुळे या सामन्यात फाफ इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणार आहे. त्यामुळे विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. विराट कोहलीने 11 ऑक्टोबर 2021 रोजी आरसीबीसाठी शेवटचं कर्णधापद भूषवलं होतं. हा सामना केकेआर विरुद्ध होता आणि त्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
विराट कोहली 15 महिन्यानंतर कर्णधारपद भूषविताना दिसत आहे. भारतीय संघासाठी त्याने दक्षिण आफ्रिकेत 15 जानेवारी 2022 रोजी कसोटीचं कर्णधारपद भूषविलं होतं. त्यानंतर त्याने प्रत्येक फॉर्मेटचं कर्णधारपद सोडलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्याने कर्णधारपद सांभाळलं आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग