IPL 2023 | आरसीबीला 16 व्या मोसमाआधी मोठा झटका, ‘हा’ खेळाडू मुकणार

आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात ही 31 मार्चपासून होणार आहे. मात्र त्याआधीच आपल्या पहिल्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत असलेल्या आरसीबची डोकेदुखी वाढलीय.

IPL 2023 | आरसीबीला 16 व्या मोसमाआधी मोठा झटका, 'हा' खेळाडू मुकणार
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 5:06 PM

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर झालंय. क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.कोरोनानंतर पूर्णपणे निर्बंधमुक्त आयोजन करण्यात येणार आहे. ऑक्शनमुळे पुन्हा खेळाडूंची अदलीबदली झाली आहे. यामुळे 10 संघांमध्ये रंगतदार सामने पाहायला मिळणार आहे. मोसमातील सलामीचा सामना हा गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा पहिला सामना 31 मार्चला खेळवला जाणार आहे.

स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होताच सर्व संघ तयारीला लागलेत. मात्र त्याआधी बंगळुरु अर्थात आरसीबीसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याच्यानंतर आता आणखी एक स्टार बॅट्समनला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे या खेळाडूला संपूर्ण मोसमात खेळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू जोश हेझलवूड याला दुखापत झाली आहे. हेझलवूड आरसीबी टीमचा भाग आहे.दुखापतीतून सावरण्यासाठी हेझलवूडला काही सामन्यांना मुकावं लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचा हा वेगवान गोलंदाज टीम इंडिया विरुद्धच्या 2 कसोटी सामन्यातूनही बाहेर झाला आहे.

हे सुद्धा वाचा

तर दुसऱ्या बाजूला दुखापतीमुळे हेझलवूड आरसीबीच्या पहिल्या सामन्यात खेळण्यासाठी फीट होणार काही नाही, हे निश्चित नाही. हा सामना 2 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळवण्यात येणार आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलिया टीमलाही फटका बसलाय. कारण, हेझलवूड टीम इंडिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर झाला आहे. दुखापतीतून तंदुरुस्त होऊन परत कमबॅक करणं हे हेझलवूडसाठी आव्हान असल्याने ऑस्ट्रेलिया टीम मॅनेजमेंटने त्याला परत मागे पाठवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान आयपीएलमध्ये स्पर्धेत सहभागी झालेल्या एकूण 10 संघाची विभागणी ही 2 गटांमध्ये करण्यात आली आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी असे 2 ग्रुप करण्यात आले आहेत.

ग्रुप ए मधील टीम

मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स.

ग्रुप बी टीम

चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स.

आरसीबी टीम | फॉफ डुप्लेसी (कॅप्टन), विराट कोहली, हिमांशु शर्मा, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, अनुज रावत, फिन एलन*, वानिंदु हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली*, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर , मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड, सिद्धार्थ कौल, रीस टॉपले, मनोज वानखेडे, राजन कुमार, अविनाश सिंह, सोनू यादव, आकाश वशिष्ठ आणि आकाश दीप.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.