IPL 2023 | मोहम्मद सिराज याची आयपीएलमध्ये अनोखी ‘शतकी’ कामगिरी
आयपीएल 16 व्या सिजनचा पहिला टप्पा पार पडला. या पहिल्या हंगामात पॉइंट्स टेबलमध्ये चढउतार पाहायला मिळत आहेत. या दरम्यान आरसीबीचा मोहम्मद सिराज याने मोठा कारनामा केलाय.
मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज शानदार कामगिरी करतोय. मोहम्मद सिराज याने या हंगामात 14 विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद सिराज हा या सिजनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. तर गुजरात टायटन्स टीमचा राशिद खान 14 विकेट्स सोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सिराज याने या हंगामात आणखी एक मोठा कारनामा केला आहे. सिराजने अनोख शतकं पूर्ण केलंय. सिराजने केलेलं हे शतक कशाबाबत आहे, हे आपण जाणून घेऊयात.
सिराजने या हंगामात 100 डॉट बॉलचं शतक पूर्ण केलंय. सिराजने आतापर्यंत सिजनमध्ये 32 ओव्हर टाकल्या आहेत. या 32 ओव्हर म्हणजे 192 बॉलपैकी 100 बॉल डॉट टाकले आहेत. तर या यादीत दुसऱ्या स्थानी गुजरात टायटन्स टीमचा मोहम्मद शमी आहे. शमीने 31 ओव्हर टाकल्या आहेत. म्हणजेच शमीने 186 पैकी 100 बॉल डॉट टाकलेत. तिसऱ्या क्रमांकावर केकेआर टीमचा वरुण चक्रवर्थी आहे. वरुणने 33.4 ओव्हर फेकल्या आहेत. त्यापैकी 76 डॉट्स बॉल टाकले आहेत.
मोहम्मद सिराज याची कामगिरी
दरम्यान आरसीबी ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्स टेबलमध्ये 4 विजयांसह पाचव्या स्थानी आहे. आरसीबी या मोसमातील आपला नववा सामना हा 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध भिडणार आहे. या मोसमात या दोन्ही संघांची दुसरी वेळ असणार आहे. या पहिल्या सामन्यात लखनऊने आरसीबीचा शेवटच्या बॉलवर 1 विकेटने विजय मिळवला होता. त्यामुळे आरसीबीचा या सामन्यात विजय मिळवून लखनऊने केलेल्या पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे.
आरसीबी टीम | फॉफ डुप्लेसी (कॅप्टन), विराट कोहली, हिमांशु शर्मा, विल जॅक्स, ग्लेन मैक्सवेल, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, अनुज रावत, फिन एलन, वानिंदु हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली*, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर , मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड, सिद्धार्थ कौल, रीस टॉपले, मनोज वानखेडे, राजन कुमार, अविनाश सिंह, सोनू यादव, आकाश वशिष्ठ आणि आकाश दीप.