IPL 2023 : विराट कोहलीमुळे आरसीबी संघाची अडचण ! ‘त्या’ 18 चेंडूतून धक्कादायक खुलासा
IPL 2023 Virat Kohli : आयपीएल 2023 स्पर्धेत विराट कोहली चांगली खेळी करत आहे. मागच्या सहा पैकी चार सामन्यात त्याने अर्धशतकं झळकावली आहेत. पण इतकं असूनही संघासाठी डोकेदुखी ठरत आहे.
मुंबई : आयपीएल जेतेपद मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ गेल्या काही वर्षापासून मेहनत घेत आहे. मात्र दरवर्षी त्याच्या पदरी निराशाच पडत आहे. यंदाही आरसीबीनं मुंबई इंडियन्सला पराभूत करत चांगली सुरुवात केली. मात्र मधल्या सामन्यांमध्ये गाडी रुळावरून घसरली. त्यानंतर पंजाब किंग्स पराभूत करत पुन्हा एकदा संघाची गाडी रुळावर आली आहे. मागच्या सहा पैकी चार सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त खेळी केली. मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स विरुद्ध त्याने अर्धशतकं झळकावली. मात्र असं असूनही विराट कोहली संघासाठी डोकेदुखी ठरत आहे.
विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटमुळे संघ अडचणीत आला आहे. खरं तर जेव्हा एखादा फलंदाज आऊट ऑफ फॉर्म असतो तेव्हा तो मोठे शॉट्स खेळत नाही किंवा त्याचा स्ट्राईक रेट कमी राहतो. मात्र विराट कोहलीच्या बाबतीत दोन्ही नाही. असं असूनही त्याचा स्ट्राईक रेट कमी होत आहे.
विराट कोहलीमुळे संघाला कसं होतेय नुकसान?
विराट कोहली पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी करत खोऱ्याने धावा करत आहे. पण जसा पॉवर प्ले संपतो तसं विराट कोहलीच्या फलंदाजीला लगाम लागते. मागच्या तीन वर्षात सातव्या, आठव्या आणि नवव्या षटकाक सर्वात कमी स्ट्राईक रेट हा विराट कोहलीचा आहे.
विराट कोहलीने मागच्या तीन वर्षात सातव्या ते नवव्या षटकात म्हणजेच 18 चेंडूत त्याने 95 च्या स्ट्राईकने धावा केल्या आहेत. हा सर्वात खराब कामगिरी आहे. यानंतर केन विलियमसन याने 98.88 आणि ऋद्धिमान साहा याने 100 स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.
#ViratKohli notches up a hat-trick of 50s at the Chinnaswamy stadium in #IPL2023 ?#RCBvDC LIVE & FREE on #JioCinema across all telecom operators ?#IPLonJioCinema #TATAIPL | @imVkohli @RCBTweets pic.twitter.com/5erkCUFJ9O
— JioCinema (@JioCinema) April 15, 2023
पॉवर प्ले संपल्यानंतर चेंडू स्पिनर्सकडे सोपवला जातो. त्यामुळे विराट कोहलीची फलंदाजी धीमी होत असल्याचं दिसून आलं आहे. विराट कोहली वेगवान गोलंदाजांना 190 च्या सरासरीने धावा करतो. तसेच त्याचा स्ट्राइक रेट 170 पेक्षा जास्त आहे.
दुसरीकडे, विराट कोहलीने स्पिनर्स विरुद्ध 22.25 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच त्याचा स्ट्राइक रेट 103 इतका आहे. त्यामुळे सहा षटकं संपली की विराट कोहलीच्या फलंदाजीला खिळ लागते. त्यामुळे आरसीबीचं नुकसान होतं. त्यानंतर येणाऱ्या फलंदाजाला सेट होण्यास वेळ मिळत नाही आणि मोठे शॉट्स खेळावे लागतात.
विचित्र परिस्थितीमुळे आरसीबीच्या मधल्या फळीच्या फलंदाजीवर ताण येतो. मोठी धावसंख्या उभारण्यासाठी आक्रमक खेळी करावी लागते. यामुळे अनेकदा चांगल्या फॉर्मात असूनही विकेट जाते. तसेच संघासाठी मोठी धावसंख्या उभारता येत नाही.