RCB vs DC Siraj Video : मोहम्मद सिराज आणि फिल सॉल्टमध्ये जुंपली, 6 6 4 धावा ठोकल्यानंतर विराटसारखा चिडला
IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यात सुद्धा वाद झाला. फिल सॉल्ट आणि मोहम्मद सिराज यांच्या शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर इतर मध्यस्थी करून त्यांना शांत केलं.
मुंबई : आयपीएल 2023 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगला. या सामन्यातही तू तू मैं मैं पाहायला मिळाली. मोहम्मद सिराज आणि फिल सॉल्ट यांच्यात चांगलीच जुंपली. भांडण वाढताना पाहून डेविड वॉर्नर आणि फाफ डुप्लेसिस यांना मध्यस्थी करावी लागली. पॉवर प्लेमध्ये डेविड वॉर्नर आणि फिल सॉल्ट यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 60 धावांची भागीदारी केली. आक्रमक खेळी पाहून बंगळुरुच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फुटला होता. मोहम्मद सिराजला सलग दोन षटकार पडल्याने अजूनच वातावरण तापलं.
मोहम्मद सिराजला पाचवं आणि त्याचं वैयक्तिक दुसरं षटक कर्णधार फाफ डुप्लेसिसने सोपवलं होतं. पहिल्याच दोन चेंडूवर सॉल्टने उत्तुंग दोन षटकार ठोकले. त्यानंतर चौकार मारला. मात्र लाईन अँड लेंथ बिघडल्याने चौथा चेंडू वाइड पडला. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं आहे.
Heated argument between siraj n salt.. #RCBvsDC pic.twitter.com/luwx56oTbp
— aqqu who (@aq30__) May 6, 2023
इतकंच काय तर सिराजने बोट दाखवून सॉल्टला चांगलंच खडसावल्याचं व्हिडीओत दिसलं. त्यानंतरच्या तीन चेंडूवर दोन धावा आल्या. सिराजने एका षटकात 19 धावा दिल्या. त्यानंतर फिल सॉल्टने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली.
बंगळुरुचा डाव
बंगळुरुने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फाफ आणि विराट कोहलीने सावध सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 82 धावांची भागीदारी केली. मात्र मिशेल मार्शच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने त्याचा झेल घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल आपलं खातंही खोलू शकला नाही. मिशेल मार्शने त्याला पहिल्या चेंडूवर तंबूत परत पाठवलं.
दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर विराट आणि महिपाल लोमरोर यांनी डाव सावरला. दोघांनी 55 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीला मुकेश कुमारने तंबूचा रस्ता दाखवला. खलील अहमदने त्याचा झेल घेतला. त्याने 46 चेंडूत 55 धावांची खेळी केली.
महिपाल लोमरोरनं आयपीएलमधलं पहिलं अर्धशतक ठोकलं. त्याने 26 चेंडूत 52 धावा केल्या. त्यानंतर दिनेश कार्तिकने 9 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर अनुज रावतने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.
दोन्ही संघाचे खेळाडू
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.