Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli | विराट कोहली याने सौरव गांगुली याच्यासोबत नक्की काय केलं?

आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा त्याच्या तापट आणि आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. विराटच्या या आक्रमकपणाचं दर्शन क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यात झालं.

Virat Kohli | विराट कोहली याने सौरव गांगुली याच्यासोबत नक्की काय केलं?
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 9:22 PM

लखनऊ  |आयपीएल 2023 च्या 20 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिट्ल्सवर 23 धावांनी विजय मिळवला आहे. आरसीबीचा हा या मोसमातील दुसरा सामना ठरला आहे. तर दिल्लीचा हा सलग पाचवा पराभव ठरला आहे. या सामन्यात विराट कोहली याने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. विराटने अर्धशतक ठोकल्यानंतर आक्रमकपणे जल्लोष केला. तसेच विराट याने कॅच घेतल्यानंतर दिल्लीच्या डगआऊटच्या दिशेने रागाने पाहिलं. विषय इथवरच थांबला अशातला भाग नाही. सामना संपल्यानंतर साधारणपणे दोन्ही संघांचे खेळाडू आणि इतर खेळाडू एकमेकांसोबत हस्तांदोलन करतात. मात्र या दरम्यान विराटने सौरव गांगुली याच्यासोबत जे काही केलं, ते सोशल मीडियावर व्हायर झालं आहे.

विराटने सामन्यानंतर सर्वांसोबत हस्तांदोलन केलं. मात्र दिल्ली कॅपिट्ल्स डायरेक्ट ऑफ क्रिकेट सौरव गांगुली याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. इतकंच नाही विराटने गांगुलीसोबत हस्तांदोलनही केलं नाही. यावेळेस विराट रिकी पॉन्टिंगसोबत बोलत होता. या सर्व घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या प्रकारामुळे पुन्हा एकदा विराट आणि गांगुली यांच्यातील कर्णधारपदावरुन असलेला जुना वाद पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आला आहे.

व्हीडिओमध्ये विराट स्पष्टपणे गांगुलीकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूने गांगुली सर्वांसोबत हस्तांदोलन करत येतो. विराट येताच गांगुली थांबतो, पण विराट त्याच्याकडे पाहत नाही.

विराट याने गांगुलीसोबत हस्तांदोलन टाळलं

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज आणि विजयकुमार विशाख.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), मिचेल मार्श, यश धुल, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे आणि मुस्तफिजुर रहमान.