बंगळुरू : आयपीएलमधील 20 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यामध्ये आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 174 धावा केल्या आहेत. यामध्ये किंग विराट कोहली याने सर्वाधिक 50 धावा केल्या, तर या अर्धशतकासह कोहलीने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये त्याचा हा रेकॉर्ड मोडणं शक्य वाटत नाही. विराट कोहली असा विक्रम करणारा पहिलाच खेळाडू आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सलामीला उतरलेल्या विराट कोहली याने 11 धावा केल्या तेव्हाच त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला. अशी कामगिरी करणारा विराट पहिलाच खेळाडू आहे. आरसीबीचं होम ग्राऊंड असणाऱ्या एम चिन्नास्वामी मैदानावर कोहलीने वैयक्तिक 2500 धावा पूर्ण केल्या आहेत.
2️⃣5️⃣0️⃣0️⃣ out of the ♾️ reasons why we ❤️ King Kohli! ?
Most by any player at a single venue in the IPL! ?#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #RCBvDC @imVkohli pic.twitter.com/DzWQLsfq8G
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 15, 2023
विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आरसीबी संघाकडून खेळत आहे. इतर कोणत्याही संघाकडून कोहली आतापर्यंत खेळला नाही. कोविडमुळे आयपीएलचा एक हंगामही भारताच्या बाहेर खेळवला गेला होता. नाहीतर हा विक्रम कोहलीने आधीच आपल्या नावावर केला असता.
विराट कोहली याने 34 चेंडूत 50 धावा केल्या. यंदाच्या हंगामामध्ये कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसलाय. सामन्याच्या सुरूवातीपासूनच तो आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहे. कोहली सुरूवातीला वेळ घेत नंतर त्याच्या रंगात येतो. मात्र या सीझनमध्ये कोहलीची वेगळी स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली आहे.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, यश धुल, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार विशाख