IPL 2023 RCB vs GT : बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना रद्द होण्याची शक्यता, मुंबईला होणार फायदा ? कारण…
आयपीएल 2023 स्पर्धेतील प्लेऑफचं गणित आता शेवटच्या सामन्यापर्यंत काही सुटलेलं नाही. गुजरात, चेन्नई आणि लखनऊने आपलं स्थान निश्चित केलं आहे. पण एका संघांचं अजून काही निश्चित नाही.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील प्लेऑफची चुरस काही संपलेली नाही. साखळी फेरीतील दोन सामने उरले असून अजूनही जर तरचं गणित आहे. गुजरात, चेन्नई आणि लखनऊ या तीन संघांनी प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. तर एका जागेसाठी बंगळुरु आणि मुंबईमध्ये चुरस आहे. असं असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं टेन्शन वाढलं आहे. कारण प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी बंगळुरुला गुजरात विरुद्धचा सामना काहीही करून जिंकायचा आहे. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे बंगळुरुला सामना रद्द होण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे त्याचा थेट फायदा मुंबईला होण्याची शक्यता आहे.
आरसीबी विरुद्ध गुजरात सामन्यापूर्वी शनिवारी चिन्नास्वामी मैदानात पाऊस झाला आहे. सामन्यापूर्वी पावसाने हजेरी लावल्याने बंगळुरु संघाचं टेन्श वाढलं आहे. जर रविवारी खरंच पाऊस झाला तर आरसीबीचं प्लेऑफचं स्वप्न भंगू शकतं.
It's raining currently in Chinnaswamy. pic.twitter.com/Mwgq1cMZiB
— Johns. (@CricCrazyJohns) May 20, 2023
आरसीबी आणि गुजरात सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा सामना वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. जर मुंबईचा संघ या सामन्यात हरला तर आरसीबी प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. आयपीएल इतिहासात आरसीबीच्या नावावर अजून एकही जेतेपद नाही. त्यामुळे यंदा प्लेमध्ये स्थान मिळवण्यासोबत जेतेपदावर नाव कोरण्याचा बंगळुरुचा प्रयत्न असेल.
दोन्ही संघांचा संपूर्ण स्क्वॉड
बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, केदार जाधव, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.
गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.