RCB vs GT Weather Report | आरसीबीसाठी वाईट बातमी, पावसामुळे प्लेऑफचं स्वप्न भंगणार?

आयपीएल 2023 च्या प्लेऑफचं एका जागेसाठीचं समीकरण हे साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र या जागेसाठी आरसीबी आणि मुंबई या दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.

RCB vs GT Weather Report | आरसीबीसाठी वाईट बातमी, पावसामुळे प्लेऑफचं स्वप्न भंगणार?
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 4:31 PM

बंगळुरु | आयपीएल 16 व्या मोसमात रविवारी 21 मे रोजी साखळी फेरीतील शेवटचं डबल हेडर आयोजित करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. तर दुसऱ्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स भिडणार आहेत. प्लेऑफसाठी गुजरात, चेन्नई आणि लखनऊ या तिन्ही संघांनी क्रमाने प्रवेश केला आहे. तर आता अवघ्या एका जागेसाठी मुंबई, आरसीबी आणि राजस्थान हे तिन्ही संघांमध्ये चढाओढ आहे. आता हा तिसरा संघ कोणता असेल, हे या डबल हेडरनंतर स्पष्ट होईल. मात्र त्याआधी आरसीबीसाठी वाईट बातमी समोर आली आहे.

आरसीबी विरुद्ध जीटी यांच्यात मोसमातील साखळी फेरीमधील अखेरचा सामना असणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. आरसीबीला प्लेऑफसाठी कोणत्याही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. मात्र या सामन्यात पाऊस आरसीबीसाठी व्हिलन ठरु शकतो. या सामन्यादरम्यान पावसाची तीव्र शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान या स्टेडियम परिसरात हवामान कसं असेल, हे जाणून घेऊयात.

आरसीबीचा पावसामुळे गेम ओव्हर?

वेदर डॉट कॉमनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात पाऊस होण्याची 60 टक्के शक्यता आहे. सामना सुरु होण्याच्या वेळेआधी पावसाची 70 टक्के शक्यता आहे. त्यानंतर पुढील 3 तासांमध्ये पाऊसाची शक्यता ही 58 ते 63 टक्के आहे

ताज्या आकडेवारीनुसार मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघांच्या नावावर प्रत्येकी 14-14 पॉइंट्स आहेत. मात्र आरसीबी चांगल्या नेट रनरेटसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर मुंबईचा नेट रनरेट हा मायन्समध्ये आहे. त्यामुळे मुंबई 14 पॉइंट असूनही सहाव्या स्थानी आहे. मुंबई हैदराबाद विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळत आहे. या सामन्यात मुंबईने आणि दुसऱ्या सामन्यात आरसीबीने गुजरातवर विजय मिळवल्यास निकाल हा नेट रनरेटच्या आधारावर ठरेल.

मात्र मुंबईचा विजय झाला आणि आरसीबी विरुद्ध गुजरात सामन्यात पाऊस झाला, तर पलटण प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरेल. कारण मुंबईचे विजयासह 16 पॉइंट्स होतील. तर पावसामुळे 1-1 पॉइंट्स वाटून गेल्याने आरसीबीचे एकूण 15 पॉइंट्स होतील.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.