Amit Mishra | अमित मिश्राकडून ऑन कॅमेरा चिटिंग, नियमाचं उल्लंघन, कारवाई होणार?

लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर सनसनाटी विजय मिळवला. मात्र या सामन्यादरम्यान अमित मिश्राने मोठी चूक केली. नक्की काय केलं पाहा

Amit Mishra | अमित मिश्राकडून ऑन कॅमेरा चिटिंग, नियमाचं उल्लंघन, कारवाई होणार?
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 4:34 PM

बंगळुरु | आयपीएल 16 व्या मोसमातील 15 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर शेवटच्या बॉलवर 1 रन घेत 1 विकेटने सनसनाटी विजय मिळवला. आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 213 धावांचं आव्हान लखनऊने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मात्र या सामन्यादरम्यान लखनचा अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याने कोरोना संबंधित नियमाचं उल्लंघन केलं. मिश्राने बॉलिंग करताना बॉलवर लाळ लावली. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. पंचांनी मिश्राला त्याची चूक लक्षात आणून दिली. याच ओव्हरमध्ये मिश्राने विराट कोहली याला आऊट केलं.

नक्की काय झालं?

आरसीबीच्या डावातील 12 वी ओव्हर मिश्रा टाकायला आला. मिश्राने बॉलवर लाळ लावली. लाळ लावल्याने बॉल टर्न होण्यास मदत होते. याचाच प्रत्यय या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर आला. मिश्राने विराटला मार्क्स स्टोयनिसच्या हाती 61 धावांवर कॅच आऊट केलं.

कोरोनाच्या शिरकावानंतर आयसीसीकडून बॉलवर लाळ लावण्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. हा नियम अजूनही लागू आहे. मिश्रा बॉलवर लाळ लावणारा काही पहिला गोलंदाज नाही. याआधीही बऱ्याच गोलंदाजांकडून असा प्रकार अनावधानाने किंवा जाणीवपूर्वक करण्यात आला आहे.

मिश्राच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर रान पेटलंय. नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. एका रिपोर्टनुसार मिश्राला या कृतीसाठी त्याला पंचांकडून खडेबोल सुनावण्यात आलं आहे. तसेच त्यानंतर बॉल सॅनिटायजरने स्वच्छ करण्यात आला.

अमित मिश्रा याच्याकडून लाळेचा वापर

आयसीसीने कोरोनानंतर खबरदारी म्हणून बॉलवर लाळ लावण्यावर प्रतिबंध घातला. बॉलवर लाळ लावणाऱ्या टीमच्या प्रतिस्पर्धी संघाला 5 धावा देण्यात येतील, असा नियम आहे. तसेच दंडात्मक कारवाईआधी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खेळाडू आणि त्या संघाला 2 वेळा त्याबाबत समज देण्यात यावा, त्यानंतरच कारवाई करावी, असंही आयसीसीने नमूद केलं आहे. दरम्यान आता अमित मिश्रा याच्यावर कोणती कारवाई करण्यात येणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, रवी बिश्नोई, ए खान, जयदेव उनाडकट आणि मार्क वुड.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, ए रावत, एच पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.