RCB vs MI | मुंबई इंडियन्सच्या पराभवाची मालिका सुरुच , सलग 11 वर्षांपासूनची परंपरा कायम

मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या 16 व्या मोसमातील सुरुवात ही पराभवाने झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबईवर 8 विकेट्सने विजय मिळवत या हंगामातील सुरुवात विजयाने केली आहे. तर मुंबईवर असलेला तो डाग पुसण्यासाठी आणखी एक वर्षाची प्रतिक्षा पाहावी लागणार आहे.

RCB vs MI | मुंबई इंडियन्सच्या पराभवाची मालिका सुरुच , सलग 11 वर्षांपासूनची परंपरा कायम
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 12:15 AM

बंगळुरु | मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेतील गेल्या 10 वर्षातील परंपरा या वर्षातही कायम ठेवली आहे. मुंबईचा आयपीएलच्या 16 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 8 विकेट्सने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. या पराभवासह मुंबई इंडियन्सचं 2013  पासून प्रत्येक मोसमातील आपला पहिला सलामीचा सामना जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. मुंबईची पराभवाने सुरुवात झाल्याने मुंबईच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सला आणि मुंबईच्या चाहत्यांना विजयी सुरुवातीसाठी पुढील मोसमाची वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला 2013 पासून ते आतापर्यंत म्हणजेच 2023 पर्यंत  प्रत्येक मोसमातील आपला सुरुवातीचा  सामना जिंकता आलेला नाही. मुंबई इंडियन्सने 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध विजय मिळवत विजयाने सुरुवात केली होती.  मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत मुंबईला विजयी सुरुवात करण्यात अपयश आलेलं आहे. मुंबईला सलग 11 मोसमांमध्ये पराभवाने सुरुवात करावी लागली आहे.  मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी टीम आहे. मुंबईने 2013 पासून एकूण 5 वेळा रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ट्रॉफी जिंकली आहे. मात्र 2013 पासून एकदाही मोसमाची सुरुवात विजयाने करता आलेली नाही.

मुंबईची कामगिरी

प्रत्येक मोसमातील सुरुवात ही विजयाने व्हावी, अशी इच्छा प्रत्येक संघाची असते. मात्र मुंबईला गेल्या 10 वर्षात विजयी सलामी देता आलेली नाही. त्यामुळे मुंबई यंदा आरसीबीवर विजय मिळवत आपल्यावर लागलेला डाग पूसन काढेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र पलटणने ही नकोशी परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे आता मुंबईला हा डाग पुसून काढण्यासाठी आणि विजयी सुरुवात करण्यासाठी आणखी 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, एम ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, एच पटेल, आर टोपली, मोहम्मद सिराज, के शर्मा आणि ए दीप.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, जोफ्रा आर्चर आणि अर्शद खान.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.