IPL 2023 RCB vs RR : विराट कोहली याच्या आरसीबीचा राजस्थावर ‘रॉयल’ विजय

आरसीबीने 20 ओव्हर्समध्ये 189 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघाला 182 धावांपर्यंत मजल मारता आली नाही.

IPL 2023 RCB vs RR : विराट कोहली याच्या आरसीबीचा राजस्थावर 'रॉयल' विजय
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 8:03 PM

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामधील सामन्यामध्ये आरसीबीने 7 धावांनी विजय मिळवला आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यामध्ये हर्षल पटेल याने जबरदस्त बॉलिंग करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. आरसीबीने 20 ओव्हर्समध्ये 189 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघाला 182 धावांपर्यंत मजल मारता आली नाही. आरसीबीकडून हर्षल पटेल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

राजस्थान संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र सुरूवात एकदम खराब झाली. सलामीवीर जोस बटलर याला मोहम्मद सिराजने बोल्ट आऊट केलं. त्यानंतर युवा यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी चांगली भागीदारी केली होती. दोघेही काही अंतराने बाद झाले, यामध्ये पडिक्कलने 52 धावा तर जयस्वालने 47 धावा केल्या. संजू सॅमसनला 22 धावांवर हर्षल पटेलने आऊट केलं. मोक्याच्याक्षणी खतरनाक हेटमायरला रन आऊट करत आरसीबीने सामना ओढला.

अश्विनने येत 12 धावा केल्या आणि काहीशी रंगत आणली मात्र तोही कॅच आऊट झाला. शेवटला दोन चेंडूत 10 धावांची गरज होती तेव्हा आरआरने अब्दुल बासिफ याला पाठवलं खरं पण त्याला काही चमक दाखवता आली नाही.

आरसीबीची बॅटींग

आरसीबी संघाची सुरूवात एकदम खराब झाली होती. विराट कोहली आणि शाहबाज अहमद याला ट्रेंट बोल्ट या दोघांना बाद करत मोठे धक्के दिले होते. मात्र त्यानंतर फाफ आणि मॅक्सवेल यांनी 127 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणलं. आरसीबीच्या 12 धावांवर दोन विकेट गेल्या होत्या त्यानंतर दोघांनी शतकी भागीदारी केली. 139ला फाफ धावबाद झाला होता त्यानंतर मॅक्सवेलही बाद झाला. दिनेश कार्तिक 16 धावा , वानिंदू हसरंगा 6 धावा यांना मोठी खेळी करता आली नाही.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (C), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (W), सुयश प्रभुदेसाई, डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....