Anushka Sharma | अनुष्का शर्मा हीच्यामुळे आरसीबीचा पराभव? अभिनेत्री पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सोमवारी 10 एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्सकडून 1 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. नेटकरी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिला या कारणीभूत ठरवत आहेत.

Anushka Sharma | अनुष्का शर्मा हीच्यामुळे आरसीबीचा पराभव? अभिनेत्री पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 5:26 PM

बंगळुरु | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सोमवारी 10 एप्रिल रोजी 212 धावा करुनही पराभव स्वीकारावा लागला. आयपीएल 16 व्या हंगामातील 15 वा सामना आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. लखनऊने 213 धावांचं आव्हान हे शेवटच्या चेंडूवर 1 विकेट्स राखून पूर्ण केलं. लखनऊने सनसनाटी विजय मिळवला आणि आरसीबीचा त्यांच्याच घरच्या मैदानात पराभव केला. लखनऊने या विजयासह आरसीबीला विजयी हॅटट्रिक करण्यापासून रोखलं. आरसीबीने आयपीएल 15 व्या मोसमात लखनऊचा दोन्ही सामन्यात पराभव केला होता. आरसीबीला हा सामना जिंकून लखनऊ विरुद्ध हॅटट्रिक करण्याची संधी होती. मात्र तसं झालं नाही.

आरसीबीच्या फलंदाजांनी तडाखेदार बॅटिंग केली. विराट कोहली, कॅप्टन फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या पहिल्या 3 फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. मात्र त्यानंतरही आरसीबीच्या गोलंदाजांनी कच खाल्ली. आरसीबीच्या गोलंदाजांना 213 धावांचाही बचाव करता आला नाही. आरसीबीचा हा या मोसमातील दुसरा पराभव ठरला. या पराभवासाठी विराट कोहली याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हीला कारणीभूत ठरवलं जात आहे. अनुष्का शर्मा या सामन्याला उपस्थित होती.

आरसीबीचा पराभव झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अनुष्का शर्माला ट्रोल करायला सुरुवात केली. अनुष्का हीला याआधीही बरेचदा आरसीबीच्या पराभवासाठी आणि विराट कोहली याच्या फ्लॉप कामगिरीसाठी कारणीभूत ठरवत ट्रोल करण्यात आलं आहे. मात्र आता पुन्हा एकदा अनुष्का नेटकऱ्यांच्या निशाण्यावर धरलं आहे.

आरसीबीच्या पराभवानंतर मीम्स व्हायरल

तर दुसऱ्या बाजूला विराट कोहली याने लखनऊ विरुद्ध केलेल्या अर्धशतकामुळे अनुष्का आनंदी होती. विराटने 61 धावांची खेळी केली. आरसीबी 213 धावांच्या आव्हानाचा बचाव करायला उतरली. तेव्हा जसा जसा सामना रंगात येत होतो, तसं तसं अनुष्का आनंदी दिसत होती, कारण सामना काही वेळ आरसीबीच्या बाजूने झुकला होता. मात्र मार्क्स स्टोयनिस, निकोलस पूरन आणि आयुष बदोनी या तिकडीने फटकेबाजी करत सामना फिरवला आणि लखनऊला विजय मिळवून दिला. आरसीबी जिंकता जिंकता हरल्यानंतर अनुष्काची रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | के एल राहुल (कॅप्टन), कायले मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्क्स स्टॉयनिस, कृणाल पंड्या, अमित मिश्रा, रवी बिश्नोई, ए खान, जयदेव उनाडकट आणि मार्क वुड.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, ए रावत, एच पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज आणि वेन पारनेल.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.