Virat Kohli : ‘भविष्यात जर परत विराटने असं केलं तर…’; नवीन उल हकचा कोहलीला उघडपणे इशारा!
विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यामध्ये तू तू मे मे झालं. त्यानंतर कोहली आणि गंभीर एकमेकांना भिडले होते. या वादामुळे आयपीएलला डाग लागलाच आणि खेळाडूंवरही टीका झाली होती. अशातच या वादामध्ये नेमकं काय झालं होतं ते नवीन उल हक याने सांगितलं आहे.
मुंबई : आयपीएलमधील 16 व्या पर्वामध्ये स्टार खेळाडू विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यामधील राडा कोणीही विसरलं नसेल. आरसीबी आणि लखनऊमधील मॅचदरम्यान झालेला राडा अवघ्या क्रिकेट जगताने पाहिलेला. त्या वादामध्ये नेमकी चूक कोणाची होती? कारण मैदानात असताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यामध्ये तू तू मे मे झालं. त्यानंतर कोहली आणि गंभीर एकमेकांना भिडले होते. या वादामुळे आयपीएलला डाग लागलाच आणि खेळाडूंवरही टीका झाली होती. अशातच या वादामध्ये नेमकं काय झालं होतं ते नवीन उल हक याने सांगितलं आहे.
काय म्हणाला नवीन उल हक?
नवीन उल हकने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, मी कोणालाच काही चुकीचं बोलत नाही आणि मला कोणी काही चुकीचं बोललेलंही ऐकून घेत नाही. मॅच संपल्यानंतर आम्ही हस्तांदोलन करताना तेव्हा विराटने सुरुवात केली होती. कारण नंतर रेफरीने ठोठावलेल्या दंडावरून हे सर्व कोणी सुरू केले हे स्पष्ट होत असल्याचं नवीन म्हणाला. भविष्यात जर परत असं झालं तर मी याच पद्धतीने उत्तर देणार असल्याचंही नवीनने बोलताना सांगितलं.
मी शेक हँड करून माघारी जात असताना कोहलीने माझा हात पकडून ठेवला. त्यावेळी मी त्याचा हात झटकला, पण सोशल मीडियावर माझ्याविरूद्ध दाखवण्यात आलं. याचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही कारण मी फक्त खेळाकडे लक्ष देतो. मी सहसा स्लेजिंग करत नाही पण त्या दिवशी सामन्यात मी कोहलीला एक शब्दही बोललो नसल्याचंही नवीनने म्हटलं आहे.
दरम्यान, विराट कोहली आणि नवीनची भांडणं झालीत. त्यानंतर गौतम गंभीर आल्यावर दोघांमध्ये वातावरण तापलेलं होतं. अमित मिश्रा याने मध्यस्थी करत भांडणं मिटावलं होतं.त्यानंतरही दोघे आरसीबी आणि लखनऊच्या मॅचवेळी इन्स्टा स्टोरी टाकत एकमेकांनी आपली टशन सुूरू ठेवलीये.