IPL 2023 : MI vs RCB | आरसीबीला मुंबई इंडिअन्सच्या गोलंदाजांनी रोखलं, जिंकण्यासाठी ‘इतक्या’ धावांचं आव्हान!

आरसीबीकडून फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर हा स्कोर उभा केला होता.

IPL 2023 : MI vs RCB | आरसीबीला मुंबई इंडिअन्सच्या गोलंदाजांनी रोखलं, जिंकण्यासाठी 'इतक्या' धावांचं आव्हान!
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 9:53 PM

मुंबई : मुंबई इंडिअन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाला 200 धावांचं लक्ष्य दिलं आहे. आरसीबीकडून फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर हा स्कोर उभा केला होता. फाफने  60 धावा तर मॅक्सवेलने 68 धावा केल्या आहेत. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फ याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

आरसीबीची बॅटिंग 

पहिल्याच ओव्हरमध्ये नेहल वढेराने फाफ डू प्लेसिस याचा कॅच सोडला होता. त्यानंतर जेसन बेहरेनडॉर्फला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विराट कोहली कॅच आऊट झाला. 1 धावा काढून तो माघारी परतला, इशान किशनने त्याचा कॅच घेतला. जेसन बेहरेनडॉर्फच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अनुज रावतने अतरंगी फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही यशस्वी झाला नाही. 6 धावांवर तो आऊट झाला. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस यांनी मुंबईच्या गोलंदाजाना धुवून काढलं

ग्लेन मॅक्सवेल याने 68 धावांची खेळी केली यामध्ये त्याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले. तर फाफ ने 41 चेंडूत 65 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. दोघे बाद झाल्यावर खेळायला आलेल्या दिनेश कार्तिक आणि केदार जाधव यांनी संघाला 199 पर्यंत पोहोचवलं.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (W), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.