KKR vs RR IPL 2023 : तीन पराभवानंतर राजस्थानचं ‘यशस्वी भव:’, कोलकात्यावर ‘जय’स्वाल पडला भारी

KKR vs RR IPL 2023 : राजस्थान रॉयल्सने कोलकात्याला पराभूत करत सामन्यात जोरदार कमबॅक केलं आहे. इतकंच काय तर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. या विजयाचा शिल्पकार ठरला तो यशस्वी जयस्वाल

KKR vs RR IPL 2023 : तीन पराभवानंतर राजस्थानचं 'यशस्वी भव:', कोलकात्यावर 'जय'स्वाल पडला भारी
राजस्थानच्या कोलकात्यावर दणदणीत विजय, टॉप 4 मध्ये पुन्हा मिळवलं स्थानImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 10:54 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सला 9 गडी राखून पराभूत केलं. कोलकात्याने विजयासठी दिलेल्या धावा कमी षटकात पूर्ण केल्याने राजस्थानच्या नेट रनरेटमध्येही जबरदस्त फरक पडला आहे. कोलकात्याने 20 षटकात 8 गडी गमवून 149 धाव केल्या आणि विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थानने 13.1 षटकात पूर्ण केलं. या विजयासह राजस्थानने टॉप 4 मध्ये स्थान मिळवलं आहे.

राजस्थानचा डाव

यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर जोडी मैदानात उतरली. पहिल्या चेंडूपासून यशस्वी जयस्वालने आक्रमक सुरुवात केली. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. यशस्वी जयस्वालने नितीश राणाची गोलंदाजी अक्षरश फोडून काढली. षटकार आणि चौकारांची आतषबाजी करत 26 धावा ठोकल्या. त्यानंतर चुकीच्या कॉलमुळे जोस बटलर बाद झाला. मात्र यशस्वी जयस्वालचा झंझावात काही संपला नाही. 13 चेंडूत जलद अर्धशतक ठोकलं. त्याला संजू सॅमसनची चांगली साथ मिळाली. कोलकात्याचे गोलंदाज पूर्णत: हतबल दिसून आले.

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील 56 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होत आहे. या सामन्यात कोलकात्यानं विजयासाठी 150 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता हे आव्हान कोलकाता रोखतं की राजस्थान पूर्ण करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

कोलकात्याचा डाव

राजस्थानने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जेसन रॉय आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी सावध सुरुवात केली. मात्र पॉवरप्लेच्या तिसऱ्या षटकापासून आक्रमक खेळीला सुरुवात केली. आक्रमक करताना जेसन रॉयचा जबरदस्त झेल सिमरॉन हेटमायरने घेतला. 10 धावा करून तो तंबूत परतला. त्यानंतर गुरबाजला बाद करत ट्रेंट बोल्टने दुसरा धक्का दिला. नितीश राणा आणि वेंकटेश अय्यरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण चुकीचा फटका मारत चहलच्या गोलंदाजीवर नितीश राणा बाद झाला.

कोलकात्याला आंद्रे रसेलच्या रुपाने चौथा धक्का बसला. अवघ्या 10 धावा करून तंबूत परतला. पण एक बाजून वेंकटेश अय्यर सावरून धरली होती. वेंकटेश अय्यरने 42 चेंडूत 57 धावा केल्या. त्यानंतर शार्दुल ठाकुरने काही खास केलं नाही. चहलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. रिंकु सिंहला काही खास करता आलं नाही. चहलच्या गोलंदाजीवर 16 धावा करून बाद झाला.चार गडी बाद करत चहलच्या पर्पल कॅपचा मानकरी ठरला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.