Dhanshree Verma | युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा हीचा तो व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
डान्सर, युट्युबर आणि टीम इंडियाचा क्रिकेटर युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा हीचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
मुंबई | टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स टीमकडून खेळतोय. एका बाजूला युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये बिजी असताना दुसऱ्या बाजुला त्याची पत्नी धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. टीम इंडियाचा स्टार बॅट्समन श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे आयपीएलमध्येही खेळत नाहीये. काही दिवसांपूर्वी धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यर हे शार्दुल ठाकूर याच्या लग्नात एकत्र दिसले होते. त्यानंतर हे दोघे एका पार्टीत एकत्र आले होते. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याच्या चर्चांना आणखी हवा मिळाली होती. या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशी शंका नेटकऱ्यांना आहे. या दरम्यान आता धनश्री वर्मा हीचा सोशल मीडियावर एक व्हीडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
धनश्री वर्मा हीचा व्हायरल व्हीडिओ
View this post on Instagram
धनश्री सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत आपले हॉट फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते. धनश्री एक डान्सर आहे. ती आपल्या डान्सचे व्हीडिओही शेअर करत असते. धनश्रीने असाच एक आपला व्हीडिओ चाहत्यांसोबत शेअर केलाय. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. धनश्रीच्या या व्हीडिओमुळे तिचे चाहते घायाळ झाले आहेत. धनश्रीच्या या फोटोवर कुणी किती गोड दिसतेय, अशा कमेंट केल्यात. तर कुणी हाय सेक्सी असंही म्हटलंय.
युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये बिजी
दरम्यान दुसऱ्या बाजूला युजवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये बिजी आहे. युजवेंद्र खेळत असलेल्या राजस्थान रॉयल्स टीम सध्या जोरात आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. या 6 पैकी 4 सामन्यात राजस्थानने विजय मिळवला आहे. विजय, पराभव, सलग 3 विजय आणि पराभव असा राजस्थान रॉयल्स टीमचा आतापर्यंतचा इथवरचा प्रवास राहिला आहे. राजस्थान रॉयल्स पॉइंट्स टेबलमध्ये 8 गुणांसह अव्वल स्थानी विराजान आहे.
तर चहलने आतापर्यंत राजस्थानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. चहलने आतापर्यंत या मोसमातील 6 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. चहल पर्पल कॅपच्या शर्यतीत 11 विकेट्ससह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. राजस्थान रॉयल्सचा आगामी सामना हा आता 23 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे चहलने या सामन्यात चांगली कामगिरी केल्यास नक्कीच धनश्री वर्मा हीला आनंद होईल.