IPL 2023 | RR vs LSG : लखनऊ संघाचा राजस्थानवर ‘रॉयल’ विजय, सामना जिंकत लखनऊने रचला इतिहास

राजस्थान संघाचा 11 धावांनी पराभव झाला असून लखनऊने आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे.

IPL 2023 | RR vs LSG : लखनऊ संघाचा राजस्थानवर 'रॉयल' विजय, सामना जिंकत लखनऊने रचला इतिहास
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 1:15 AM

मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये राजस्थान संघाचा 11 धावांनी पराभव झालेला आहे. लखनऊने दिलेल्या 154 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना राजस्थान संघाला निर्धारित 20 षटकात 144 धावाच करता आल्या. चांगल्या सुरूवातीनंतरही राजस्थान संघाला विजय मिळवता आला नाही. लखनऊ संघाने या विजयासह मोठा इतिहास रचला आहे.

लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान यांच्यात याआधी दोन सामने झाले होते. त्यातील दोन्ही सामन्यात राजस्थानने विजय मिळवला होता. मात्र आजच्या सामन्यामध्ये लखनऊ संघाने विजय मिळवत आपला राजस्थानविरुद्ध पहिल्या विजय संपादित करण्याचा विक्रम केला आहे.

सामन्यामध्ये राजस्थान संघाला लखनऊ संघाने दिलेले लक्ष्य गाठता आलं नाही. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाने 154 धावा केल्या होत्या, यामध्ये कायले मेयर्स याने सर्वाधिक 51 धावा, तर के एल राहुल याने 39 धावा केल्या होत्या. राजस्थान संघाकडून या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात एकदम झकास झाली होती. जोस बटलर आणि जयस्वाल यांनी 87 धावांची सलामी दिली होती. जयस्वाल बाद झाला आणि नियमित अंतराने राजस्थानचे गडी बाद होत गेले.

जयस्वालने 44 धावा तर जोस बटलरने 40 धावा केल्या होत्या. मात्र या दोघां व्यतिरिक्त राजस्थानच्या इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. याचाच फटका बसला आणि संघाला पराभवाचा सामना करावा लागला. लखनऊने राजस्थान संघावर 11 धावांनी पराभव विजय मिळवला.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (C), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (W), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, आवेश खान, युधवीर सिंग चरक, रवी बिश्नोई

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.