IPL 2023 RR vs PBKS : इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा 5 धावांनी पराभव झाला. पंजाबचा कॅप्टन शिखर धवन (56 चेंडूत 86 रन्स, नऊ चौकार, तीन षटकार) आणि प्रभसिमरन सिंह (34 चेंडूत 60 रन्स, सात चौके, तीन षटकार) यांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. पंजाब किंग्सने पहिली बॅटिंग करताना चार विकेटवर 197 धावा केल्या. धवनने जितेश शर्मासोबत (27) दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली.
राजस्थानकडून कोण चांगलं खेळलं?
प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सची टीम 192 धावांपर्यंत पोहोचली. राजस्थानकडून शिमरॉन हेटमायर (17 चेंडू 36 रन्स, तीन सिक्स, एक फोर) आणि ध्रुव जुरेलने (15 चेंडूत नाबाद 32, दोन सिक्स, तीन फोर) यांनी सातव्या विकेटसाठी 26 चेंडूत 61 धावांची भागीदारी केली. कॅप्टन संजू सॅमसनने राजस्थानकडून सर्वाधिक 42 धावा केल्या.
संजू सॅमसनने त्याच्या घोडचुकीवर काय उत्तर दिलं?
राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलरने डावाची सुरुवात केली नाही. देवदत्त पडिक्कलऐवजी सॅमसनने आर. अश्विनला सलामीला पाठवलं. तीच संजू सॅमसनची मोठी चूक ठरली. अश्विन अवघ्या 4 चेंडूत शुन्यावर आऊट झाला. अर्शदीप सिंहने त्याला शिखर धवनकरवी झेलबाद केलं. देवदत्त पडिक्कलऐवजी अश्विनला सलामीला पाठवण्याच्या निर्णयावर संजूला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला की, “जोस फिट नव्हता. कॅच पकडताना दुखापत झाल्याने त्याच्या बोटाला टाके पडले होता. पंजाबकडे दोन स्पिनर आहेत, त्यामुळे देवदत्तला ओपनिंगला पाठवलं नाही. आम्हाला मधल्या ओव्हर्समध्ये लेफ्टी बॅट्समनची गरज होती”
कोण आहे ध्रुव जुरेल?
संजू सॅमसनने ध्रुव जुरेलच कौतुक केलं. “ध्रुव मागच्या दोन सीजनपासून आमच्यासोबत आहे. आम्ही सर्व खुश आहोत. जेव्हा तुम्ही आयपील खेळण्यासाठी येता, तेव्हा एका आठवडाआधी शिबिर असतं. ध्रुव सारखा फलंदाज टीममध्ये आहे, त्यामुळे मी आनंदी आहे” असं संजू म्हणाला. ध्रुव जुरेलने लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग करताना 15 चेंडूत 32 धावा फटकावल्या. यात 3 फोर, 2 सिक्स आहेत.