RCB vs RR | ऐन लढाईत तोफेत पाणी! राजस्थान ‘क्लिन बोल्ड’, आरसीबीसचा ऐतिहासिक विजय
राजस्थान रॉयल्स टीमला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. आरसीबीला या मोठ्या विजयाचा खूप मोठा फायदा झाला आहे.
जयपूर | राजस्थान रॉयल्स टीमला आयपीएल 16 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात निराशाजनक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आरसीबीने राजस्थानवर तब्बल 112 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. आरसीबीने पहिले बॅटिंग करत राजस्थान रॉयल्स टीमला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र राजस्थानच्या फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. राजस्थान अवघ्या 59 धावांवर 10.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट झाली. आरसीबीला या 112 धावांच्या फरकामुळे पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. तसेच आरसीबीने प्लेऑफच्या दिशने एक पाऊल पुढे टाकलं आहे.
राजस्थानची 172 धावांचं पाठलाग करताना अतिशय वाईट सुरुवात झाली. आरसीबीने राजस्थानला पहिल्याच बॉलपासून धक्के द्यायला सुरवात केली. या सुरुवातीपासून राजस्थानच्या 2 फलंदाजांचा अपवाद वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. दुहेरी आकडा सोडा, एकूण 4 जणांना भोपळाही फोडता आला नाही.
आरसीबीचा विजयी क्षण
A formidable performance from @RCBTweets as they claim a mammoth 112-run victory in Jaipur ?
They climb to number 5️⃣ on the points table ????
Scorecard ▶️ https://t.co/NMSa3HfybT #TATAIPL | #RRvRCB pic.twitter.com/BxkMKBsL3W
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2023
राजस्थानकडून शिमरॉन हेटमायर याने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. जो रुट याने 10 धावा केल्या. तर कॅप्टन संजू सॅमसन आणि देवदत्त पडीक्कल या दोघांनी 4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. एडम झॅम्पा याने 2 रन्स केल्या. तर ध्रुव जुरेल 1 रनवर आऊट झाला. तर संदीप शर्मा झिरोवर नाबाद राहिला.
आरसीबीकडून वेन पार्नेल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मायकल ब्रेसवेल आणि कर्ण शर्मा या दोघांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेर पाठवलं. तर मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी 1 विकेट घेतली.
आरसीबीची बॅटिंग
दरम्यान त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. आरसीबीने राजस्थान रॉयल्स टीमला विजयासाठी 172 धावांचं आव्हान ठेवलं. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. आरसीबीकडून कॅप्टन फाफ डु प्लेलिस आणि ग्लेम मॅक्सवेल या जोडीने अनुक्रमे सर्वाधिक 55 आणि 54 धावांची अर्धशतकी खेळी केली.
महिपाल लोमरुर 1 धाव करुन बाद झाला. दिनेश कार्तिक भोपळाही फोडू शकला नाही. तर अखेरच्या काही षटकांमध्ये अनुज रावत याने काही फटके मारुन आरसीबीला 170 पार पोहचवलं. अनुज रावत याने 11 बॉलमध्ये 29 धावा केल्या. तर एम ब्रेसवेल याने नॉट आऊट 9 रन्स केल्या.
राजस्थानकडून केएम आसिफ आणि एडम झॅम्पा या जोडीने प्रत्येकी दोघांना आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर संदीप शर्मा याने 1 विकेट घेतली.
आरसीबीची पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उडी
आरसीबीला राजस्थानवर 112 धावांच्या फरकाने विजय मिळवल्याने मोठा फायदा झाला आहे. आरसीबीने या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये थेट सातव्या क्रमांकावरुन पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. आरसीबीचा नेट रन रेट हा आता +0.166 असा आहे. आरसीबीचा या सामन्याआधी नेट रन रेट हा -0. 345 असा होता. तर राजस्थानला पराभवाचा मोठा फटका बसला. राजस्थानची पाचव्यावरुन सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.