Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाड याचं अंपायर्सच्या चुकीमुळे शतक हुकलं? नेटकरी संतापले
ऋतुराज गायकवाड याला चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून करण्यात आला आहे. ऋतुराजला ज्या बॉलवर आऊट दिलं तो नो बॉल होता. मात्र त्यानंतरही अंपायर्सने त्याला आऊट दिलं, असं नेटीझन्सकडून म्हटलं जात आहे.
अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील पहिलाच सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अंपायरने दिलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे नेटकऱ्यांचा संताप सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. चेन्नईचा ओपनर बॅट्समन ऋतुराज गायकवाड याला शतक ठोकण्याची संधी होती. मात्र पंचाने दिलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे ऋतुराज शतकाला मुकल्याचा आरोप केला जात आहे. अंपायरने ऋतुराजला शतकापासून वंचित ठेवल्याचंही म्हटलं जात आहे. यामुळे ऋतुराजच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
नक्की काय झालं?
अल्जारी जोसेफ चेन्नईच्या डावातील 18 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील पहिला बॉल जोसेफ याने डायरेक्ट टाकला. ऋतुराजने या बॉलवर फटका मारला. हा कॅच शुबमन गिल याने घेतला. त्यामुळे ऋतुराजला आऊट देण्यात आलं. त्यानंतर फिल्ड अंपायरनेही ऋतुराजला घोषित केलं.
ऋतुराज गायकवाड आऊट की नॉट आऊट?
Ruturaj Gayakwad is purely not out in this angle ??#IPLonStar #RuturajGayakwad #ChennaiSuperKings #IPL https://t.co/989gzyy0eM
— Deepak Marathe (@DeepakMarathhe) March 31, 2023
व्हायरल व्हीडिओत ऋतुराज क्रिझमध्येच उभा होता. मात्र अल्जारीने टाकलेला बॉल हा क्रिझमध्ये असलेल्या ऋतुराजच्या कंबरेच्या वरुन जात असल्याचं दिसतंय. त्यामुळे ऋतुराजला नाबाद देणार असंच वाटत होतं. मात्र त्यानंतरही ऋतुराजला आऊट देण्यात आलं. यामुळे ऋतुराजला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरलाय.
ऋतुराजची बॅटिंग
ऋतुराजने आधी 23 बॉलमध्ये वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर ऋतुराजने आणखी वेगाने टॉप गिअर टाकत फटकेबाजी केली. ऋतुराजाला शतक ठोकण्याची संधी होती. मात्र ऋतुराज 92 धावांवर आऊट झाला. ऋतुराज 50 बॉलमध्ये 4 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने या धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), केन विल्यमसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, आर खान, मोहम्मद शमी, जोशवा लिटल, वाय दयाल आणि अल्जारी जोसेफ.