RCB vs DC : कोहली आणि गांगुली वादात श्रीसंतचं धक्कादायक विधान, “विराट कोहली शतक ठोकून…”

आयपीएल 2023 स्पर्धेत वादाची मालिका काही संपताना दिसत नाही. विराट कोहली आणि सौरव गांगुली वाद सर्वश्रूत आहे. त्यात गंभीर आणि विराट कोहलीचं वाजलं. आता श्रीसंतने धक्कादायक विधान केलं आहे.

RCB vs DC : कोहली आणि गांगुली वादात श्रीसंतचं धक्कादायक विधान, विराट कोहली शतक ठोकून...
RCB vs DC : एस. श्रीसंतचं सौरव गांगुलीबाबत धक्कादायक विधान, विराट कोहलीची बाजू घेत म्हणाला; 'शतक ठोकून..'
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 1:13 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत आजी माजी खेळाडूंचा वाद पाहायला मिळत आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर एकमेकांची तोंड पाहून नाक मुरडण्याचा प्रकार सुरु आहे. विराट कोहली आणि गौतम गंभीर हा वाद चांगलाच गाजला. त्याआधी गांगुली आणि विराट यांच्यात आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील कर्णधारपदावरुन असलेला जुना वाद पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आला आहे. दिल्ली विरुद्ध बंगळुरु या पहिल्या सामन्यात हे चित्र सर्वांनी पाहिलं होतं. आता दुसऱ्यांदा दिल्ली आणि बंगळुरु आमनेसामने येत आहेत. आता या वादात एस. श्रीसंतने उडी घेतली आहे. त्याने केलेल्या विधानामुळे क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.

श्रीसंतने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दुसऱ्या सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सवर खळबळजनक विधान करून लक्ष वेधून घेतलं आहे. “दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली शतक ठोकून दादाला (सौरव गांगुली) एक चांगलं ट्रिब्यूट देईल.”, असं श्रीसंतने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सांगितलं.

विराटने पहिल्या सामन्यानंतर सर्वांसोबत हस्तांदोलन केलं. मात्र दिल्ली कॅपिट्ल्स डायरेक्ट ऑफ क्रिकेट सौरव गांगुली याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. इतकंच नाही विराटने गांगुलीसोबत हस्तांदोलनही केलं नाही. यावेळेस विराट रिकी पॉन्टिंगसोबत बोलत होता. या सर्व घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

आयपीएल 2023 च्या 20 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिट्ल्सवर 23 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली याने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. विराटने अर्धशतक ठोकल्यानंतर आक्रमकपणे जल्लोष केला. तसेच विराट याने कॅच घेतल्यानंतर दिल्लीच्या डगआऊटच्या दिशेने रागाने पाहिलं होतं.

दोन्ही संघाचे खेळाडू

बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, केदार जाधव, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.

दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.