JIO IPL : खेळातही बिझनेसची खेळी! जिओवर आयपीएल फुकटात दाखवून मुकेश अंबानी असे होणार मालामाल

क्रिकेट चाहत्यांना फुकटात आयपीएलचे सामने पाहता येणार आहेत.यावेळेस आयपीएलचे लाईव्ह सामने हे जिओ सिनेमावर फुकटात दाखवण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे एकूण 14 भाषांमध्ये जिओवर सामने पाहता येणार आहेत.

JIO IPL : खेळातही बिझनेसची खेळी! जिओवर आयपीएल फुकटात दाखवून मुकेश अंबानी असे होणार मालामाल
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 8:22 PM

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मोसमात एकूण 10 संघ ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. या 16 व्या हंगामाचं देशातील 12 स्टेडियमध्ये करण्यात आलंय. या 12 स्टेडियममध्ये एकूण 74 सामने खेळवण्यात येणार आहेत. क्रिकेट चाहत्यांना आयपीएलचे सर्व लाईव्ह सामने हे मुकेश अंबानी यांच्या मालकीचं असलेल्या जिओ सिनेमावर अगदी फुकटात पाहायला मिळणार आहेत. क्रिकेट चाहत्यांना एकूण 14 भाषांमध्ये जिओवर सामने पाहता येणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आपल्या आवडत्या भाषेत सामने पाहता येतील. चाहत्यांना फुकटात सामने दाखवण्यामागेही मोठं अर्थकारण आहे. यातून जिओला पर्यायाने अंबानी यांना कसा आर्थिक फायदा होणार, हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

पॅरामाउंट ग्लोबल आणि रिलायन्स इंड्स्ट्रीजशी वायकॉम 18 चा संबंध आहे. वायकॉम 18 ने आयपीएलच्या डिजीटल राईट्ससाठी पाण्यासारखा पैसा मोजला. वायकॉमने आयपीएलचे मीडिया राईट्ससाठी डिस्नी प्लस हॉटस्टार आणि सोनी ग्रुपसारख्या दिग्गज कंपन्यांना पछाडलं. याआधी डिस्नेकडे मीडिया प्रॉपर्टीज होत्या. त्यामुळे सब्सक्रीप्शन घेऊन चाहत्यांना सामने पाहता येत होते. मात्र आता व्हीव्हर्स मिळवण्यासाठी नवा मार्ग शोधून काढला आहे.

सध्याचा जमाना हा डीजीटलचा आहे. आयपीएल सामने टीव्हीपेक्षा मोबाईलवर पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वायकॉमकडून क्रिकेट चाहत्यांना फुकटात सामने पाहायला मिळणार आहेत. या सामन्यांदरम्यान अनेक जाहिराती येतात. या ऑनलाईन जाहिरातीच्या माध्यमातून कंपनीला मजबूत उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितानुसार, आयपीएलचे ऑनलाईन सामने हे तब्बल 550 दशलक्ष दर्शक पाहतील. यामुळे डिजीटल प्लॅटफॉर्मवर टेक्नोलॉजी, ब्रँडिंग आणि ऑनलाईन रिटेल अशा व्यवसायांना चालना मिळेल, अशीही आशा कंपनीला आहे.

आयपीएलच्या 16 व्या मोसमाचा थरार हा एकूण 8 आठवडे रंगणार आहे. जिओ सिनेमावर सामने फुकटात तर पाहता येतील. मात्र त्यासाठी हवा तो इंटरनेट डाटा. इथेच सर्व गेम आहे.

आता रिलांयस जिओ इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत ग्राहकांना परवडणाऱ्या दरात डेटा पॅक उपलब्ध करुन दिले जातील. जिओने आधीच टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवलीय. ग्राहकांना डेटा पॅकसह अनेक ऑफर देण्यात येतील, अशा प्रकारने यूझर्सना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जाईल.

दरम्यान आयपीएलमध्ये स्पर्धेत सहभागी झालेल्या एकूण 10 संघाची विभागणी ही 2 गटांमध्ये करण्यात आली आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी असे 2 ग्रुप करण्यात आले आहेत.

ग्रुप ए मधील टीम

मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स.

ग्रुप बी टीम

चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.