IPL सुरू होण्याआधीच गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का, नेमकं काय झालंय!
गतवर्षी विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या गुजरात संघाला मोठा धक्का बसला आहे. गुजरातला विजेतेपद जिंकून देण्यात मोलाची भूमिका पार पाडणारा डेव्हिड मिलरबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या पर्वाला सुरू व्हायला काही दिवस शिल्लक आहेत. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये रंगणार आहे. मात्र गतवर्षी विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या गुजरात संघाला मोठा धक्का बसला आहे. गुजरातला विजेतेपद जिंकून देण्यात मोलाची भूमिका पार पाडणारा डेव्हिड मिलरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषक सुपर लीगच्या दोन सामन्यांसाठी नेदरलँड्सविरुद्ध लढणार आहे.
आयपीएल 31 मार्चपासून सुरू होत आहे आणि स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात, गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यात सामना होणार आहे, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा सामना नेदरलँड्सशी दोन सामन्यांच्या एकदिवसीय सामन्यात होणार आहे. मालिका त्यांचा पहिला सामना 31 मार्चला तर दुसरा सामना 2 एप्रिलला होणार आहे.
दक्षिण आफ्रिका दुबळ्या नेदरलँड्सविरुद्ध खेळण्यास एवढी उत्सुक असण्यामागे मोठं कारण आहे. नेदरलँड संघाला दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत केलं तरच आफ्रिकेचं आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रता निश्चित होणार आहे. त्यामुळे संघातील खेळाडूंसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.
संघ व्यवस्थापन माझ्यावर नाराज आहे कारण मी पहिला सामना खेळू शकणार नाही. चेन्नईविरुद्ध सामना न खेळणंं माझ्यासाठीही निराशाजनक असल्याचं मिलरने सांगितलं.
IPL 2023 साठी गुजरात टायटन्स संघ
हार्दिक पंड्या (c), शुभमन गिल, अभिनव मनोहर, साई सुधारसन, वृद्धिमान साहा, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, रशीद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद, केन विल्यमसन, ओडियन स्मिथ, केएस भरत , शिवम मावी, उर्विल पटेल, यश दयाल, प्रदीप सांगवान, मोहित शर्मा, जोश लिटल, दर्शन नळकांडे, जयंत यादव, आर साई किशोर.