मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाला 31 मार्चपासून सुरुवात झाली. पहिल्य सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने 4 वेळा चॅम्पियन असेलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. आतापर्यंत या मोसमात एकूण 6 सामन्यांचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलंय. या हंगामात अनेक वर्षानंतर प्रत्येक टीम आपल्या होम ग्राउंडमध्ये सामने खेळणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सने यंदाही आपला सलामीचा सामना गमावला. मुंबईला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव स्वीकारावा लागला. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने 2013 पासून एकूण 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. मात्र तेव्हाचपासून मुंबईला काही पहिला सामना जिंकता आलेलं नाही. अशी अवस्था असताना आता मोठी बातमी समोर आली आहे.
टीम मॅनेजमेंटने पहिल्या सामन्यातील पराभवानंतर थेट कॅप्टन बदलत झटकाच दिला आहे. त्यामुळे आता भारतीय खेळाडूकडून कर्णधारपद काढून ते दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला देण्यात आलं आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार बदलला आहे. हैदराबादने मिनी ऑक्शनमध्ये केन विलियमन्सन याला रिलीज केलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूची हैदराबादच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र एडम हा नेदरलँड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळत होता.
त्यामुळे त्याला पहिल्या सामन्यात उपस्थित राहता आलं नाही. यामुळे तोवर नेतृत्वाची जबाबदारी ही भुवनेश्वर कुमार याला देण्यात आली. मात्र आता एडम मार्करम एकदिवसीय मालिका संपवून भारतात आला आहे. सनरायजर्स हैदराबाद टीम मॅनेजमेंटने एडम मार्करमचा फोटो ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
एडम मार्करमची टीममध्ये एन्ट्री
And we all go, ProteYAAAAAS! ? @AidzMarkram | #OrangeFireIdhi #OrangeArmy #IPL2023 pic.twitter.com/RGZjtM7DDP
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 4, 2023
एडम मार्करम (कर्णधार) , भुवनेश्वर कुमार, अब्दुल समद, ऐडन मार्कराम , राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जानसेन, वॉशिंगटन सुंदर, फजलहक फारूकी, कार्तिक त्यागी, टी नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, अकील हुसैन, हेनरिच क्लासेन, अनमोलप्रीत सिंह, आदिल राशिद, मयंक मारकंडे, विवरांत शर्मा, मयंक डागर, समर्थ व्यास, सानवीर सिंह, उपेंद्र सिंह यादव, नीतीश कुमार रेड्डी.