मुंबई | आयपीएल 16 व्या हंगामाचं काउंटडाऊन सुरु झालंय. आता अवघे काही तासच शिल्लक आहेत. या लोकप्रिय लीगला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मोसमातील सलामीचा सामना हा गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध 4 वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी खांदेपालट सुरुच आहेत. अखेरच्या काही दिवसांमध्ये एकूण 10 संघांमध्ये अनेक अदलाबदली करण्यात आल्या. तसेच अखेरच्या दिवशी ही मोठा बदल करण्यात आला आहे. एका टीमने थेट ऐन क्षणी कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
सनरायजर्स हैदराबादने आपला कॅप्टन बदलला आहे. त्यामुळे आता भारतीय खेळाडूला कर्णधारपदाची सूत्रं सोपवण्यात आली आहेत.आधी हैदराबादच्या कर्णधारपदी दक्षिण आफ्रिकेच्या एडम मार्करम याची नियुक्ती करण्यात आली. मात्र सध्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. त्यामुळे मार्करम ही मालिका संपल्यानंतर येणार आहे.
मार्करम 3 एप्रिल रोजी भारतात येणार आहे. मात्र त्याआधी हैदराबादचा पहिला सामना हा येत्या रविवारी म्हणजे 1 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे तोवर भुवनेश्वर कुमार याच्याकडे सूत्रं सोपवण्यात आली आहेत.
दरम्यान भुवनेश्वर कुमार हा सनराजजर्स हैदराबादसोबत 2013 पासून आहे. भुवनेश्वरने आतापर्यंत एकूण 7 सामन्यांमध्ये हैदराबादचं कर्णधारपद भूषवलंय. भुवनेश्वरने 2019 साली एकूण 6 तर 2022 मध्ये 1 मॅचमध्ये कॅप्टन्सी केली होती.
भुवनेश्वरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 146 सामने खेळले आहेत. यात त्याने 154 विकेट् घेतल्या आहेत. भुवनेश्वरची 19 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.
भुवनेश्वर कुमार (कर्णधार) , अब्दुल समद, ऐडन मार्कराम , राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जानसेन, वॉशिंगटन सुंदर, फजलहक फारूकी, कार्तिक त्यागी, टी नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, अकील हुसैन, हेनरिच क्लासेन, अनमोलप्रीत सिंह, आदिल राशिद, मयंक मारकंडे, विवरांत शर्मा, मयंक डागर, समर्थ व्यास, सानवीर सिंह, उपेंद्र सिंह यादव, नीतीश कुमार रेड्डी.