SRH vs KKR | जितबो रे! केकेआरचा हैदराबादवर 5 धावांनी विजय, वरुण चक्रवर्थी चमकला
आयपीएल 16 व्या सिजनमधील 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादवर 5 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आहे. वरुण चक्रवर्थी हा केकेआरच्या विजयाचा हिरो ठरला.
हैदराबाद | कोलकाता नाईट रायडर्स टीमने सनरायजर्स हैदराबाद संघावर 5 धावांनी विजय मिळवला आहे. केकेआरचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. मात्र वरुण चक्रवर्थी याने शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्या फिरकीत हैदराबादच्या गोलंदाजांना हुशारीने बांधून ठेवलं आणि टीमला विजय मिळवून दिला. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या 6 बॉलमध्ये 9 रन्सची गरज होती. मात्र वरुणने या धावांचा हुशारीने बचाव करत हैदराबादला झुंजवलं. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज असताना भुवनेश्वर कुमार स्ट्राईकवर होता. मात्र या शेवटच्या बॉलवर चक्रवर्थीने फिरकीत फसवलं आणि डॉट बॉल टाकला, अशा प्रकारे केकेआरचा विजय झाला.
हैदराबादकडून कॅप्टन एडन मार्करम याने सर्वाधिक 40 बॉलमध्ये 41 धावांची खेळी केली. त्यानंतर हेनरिच क्लासेन याने 36 रन्स केल्या. अब्दुल समद 21 धावा करुन निर्णायक क्षणी आऊट झाला. राहुल त्रिपाठीने 20 धावा जोडल्या. मयंक अग्रवालने 18 रन्स केल्या. अभिषेक शर्मा 9 धावा करुन तंबूत परतला. हॅरी ब्रूक याला भोपळाही फोडता आला नाही. मार्को जान्सेन याने 1 धावा जोडली. मयंक मार्कंडे याने नाबाद 1 धाव केली.
केकेआरकडून वैभव अरोरा आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. कर हर्षित राणा, आंद्रे रसेल, अनुकूल रॉय आणि वरुण चक्रवर्थी या चौघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्याआधी केकेआरने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. केकेआरने 9 विकेट्स गमावून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या. केकेआरकडून रिंकू सिंह याने सर्वाधिक 46 धावा केल्या. कॅप्टन नितीश राणा याने 42 धावांचं योगदान दिलं. आंद्रे रसेल याने 24 धावा केल्या. जेसन रॉय 20 धावा करुन माघारी परतला.
अनुकूल रॉय याने नॉट आऊट 13 आणि वैभव अरोरा याने नाबाद 2 धावा केल्या.दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तिघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. हैदराबादकडून टी नटराजन आणि मार्को जान्सेन या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, कॅप्टन एडन मार्करम आणि मयांक मार्कंडे या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, आर गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, आर सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, एच राणा, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (wk), हॅरी ब्रूक, अब्दुल समद, मार्को जान्सेन, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, कार्तिक त्यागी आणि टी नटराजन.