SRH vs LSG | प्रेरक मंकड याची विस्फोटक खेळी, निकोलस पूरन याच तडाखा, लखनऊचा हैदराबादवर ‘सुपर’ विजय

लखनऊ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादवर धमाकेदार विजय मिळवला आहे. या विजयासह लखनऊने पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. जाणून घ्या लखनऊ पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या क्रमांकावर?

SRH vs LSG | प्रेरक मंकड याची विस्फोटक खेळी, निकोलस पूरन याच तडाखा,  लखनऊचा हैदराबादवर 'सुपर' विजय
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 8:17 PM

हैदराबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील 58 वा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. हा सामना लखनऊ सुपर जायंट्स 7 विकेट्सच्या मोठ्या फरकाने जिंकला आहे. सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. लखनऊने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 19.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. या विजयासह लखनऊने प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. तसेच पॉइंट्स टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर उडी घेतली आहे.

प्रेरक मंकड आणि निकोलस पूरन ही जोडी लखनऊच्या विजयाचा शिल्पकार ठरली. तर त्याआधी मार्क्स स्टोयनिस याने 40 धावांची धमाकेदार खेळी करत लखनऊच्या आशा कायम ठेवण्यात हातभार लावला.

त्यानंतर प्रेरक आणि निकोलस या जोडीने चौथ्या विकेटसाठी नाबाद 58 धावांची विजयी भागीदारी केली. प्रेरक याने 45 बॉलमध्ये 45 बॉलमध्ये 7 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने नाबाद 64 धावा केल्या.

निकोलस पूरन याने 13 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3चौकारांच्या मदतीने नाबाद 44 धावांची विस्फोटक खेळी केली. क्विंटन डी कॉक याने 29 धावांचं योगदान दिलं. तर कायले मेयर्स 2 धावा करुन आऊट झाला.  तर हैदराबादकडून ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे आणि अभिषेक शर्मा या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

इथेच फिरली मॅच

हैदराबाद कॅप्टन एडन मार्करम याने अभिषेक शर्मा याला सामन्यातील 16 वी ओव्हर टाकायला दिली. हीच ओव्हर टर्निंग पॉइंट ठरली. या ओव्हरमध्ये लखनऊच्या फलंदाजांनी 5 सिक्स ठोकले. तर 1 वाईडमुळे लखनऊला एकूण 31 धावा मिळाल्या.

मार्क्स स्टोयनिस याने या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर सिक्स ठोकला. दुसरा बॉल वाईड पडला. तिसऱ्या बॉलवर स्टोयनिसने पुन्हा सिक्स ठोकला. मात्र तिसऱ्या बॉलवर स्टोयनिस आऊट झाला. त्यानंतर निकोलस पूरन याने ओव्हरमधील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या बॉलवर सिक्स ठोकत सिक्सची हॅटट्रिक पूर्ण केली. या ओव्हरमुळेच लखनऊचा विजय सोपा झाला.

सनरायजर्स हैदराबादची बॅटिंग

दरम्यान त्याआधी सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला. कॅप्टन एडन मार्करम याने बॅटिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 182 धावा केल्या. हैदराबादकडून हेनरिच क्लासेन याने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. अब्दुल समद याने नाबाद 37 रन्सचं योगदान दिलं.

अनमोलप्रीत सिंह याने 36 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. एडन मार्करम याने 28 रन्स जोडल्या. राहुल त्रिपाठीने 20 रन्स केल्या अभिषेक शर्मा याने 7 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. ग्लेन फिलिप्स याला भोपळाही फोडता आला नाही.

तर लखनऊ सुपर जायंट्सकडून कॅप्टन कृणाल पंड्या याने 2 विकेट्स घेतल्या. तर युद्धवीर सिंह, आवेश खान, यश ठाकूर आणि अमित मिश्रा या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार आणि फजलहक फारुकी.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पांड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कायल मेयर्स, प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक आणि आवेश खान.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.