Rohit Sharma | रोहित शर्मा याचा छोट्या खेळीसह मोठा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा चौथाच बॅट्समन
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातून प्लेइंग इलेव्हनमध्ये कमबॅक केलं. रोहितने या कमबॅकसह मोठा कारनामा करुन दाखवला आहे.

हैदराबाद | आयपीएल 16 व्या सिजनमधील 25 वा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. सनरायजर्स हैदरबादचा कॅप्टन एडन मार्करम याने टॉस जिंकून मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि ईशान किशन ही सलामी जोडी मैदानात आली. रोहित शर्मा याने हैदराबाद विरुद्ध 14 धावा पूर्ण करता मोठा पराक्रम केला आहे. रोहित अशी कामगिरी करणारा चौथाच फलंदाज ठरला आहे. जाणून घेऊयात रोहितने नक्की काय केलं.
रोहित शर्माने आयपीएलमध्ये 6 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रोहित अशी कामगिरी करणारा एकूण चौथा आणि तिसरा भारतीय ठरला आहे. रोहितला या सामन्याआधी 6 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 14 धावांची गरज होती.रोहितने हैदराबाद विरुद्ध तिसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकला. रोहितच्या यासह आयपीएलमध्ये 6 हजार धावा पूर्ण झाल्या. रोहितने आयपीएलच्या 15 व्या वर्षपूर्तीच्या मुहुर्तावर हा अनोखा विक्रम केला आहे.
रोहितने 232 सामन्यांमधील 227 डावात या 6 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितआधी आयपीएलमध्ये विराट कोहली, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर या तिघांनीच ही कामगिरी केली आहे. आता रोहितने या तिघांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.
आयपीएलमध्ये 6 हजार धावा करणारे फलंदाज
विराट कोहली – 6 हजार 844 धावा
शिखर धवन – 6 हजार 844 धावा
डेव्हिड वॉर्नर – 6 हजार 109 धावा
रोहित शर्मा – 6 हजार 14 धावा
रोहित शर्मा याचा पराक्रम
Milestone ? – 6000 runs and counting for @ImRo45 in #TATAIPL
Keep going, Hitman ??#SRHvMI pic.twitter.com/VQeYRWivwb
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2023
रोहित शर्मा याने हैदराबाद विरुद्ध 18 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने 155.56 च्या स्ट्राईक रेटने 28 धावा केल्या. रोहितला अपेक्षित सुरुवात मिळाली होती. मात्र त्याला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. पण रोहितने केलेल्या या रेकॉर्डमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडम मार्करम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), राहूल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, मार्को जानसेन, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.