IPL 2023 : सनराइजर्स हैदराबादवर आरसीबीचा ‘विराट’ विजय, कोहलीची शतकी खेळी
IPL 2023 SRH vs RCB : हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना 187 धावांचं आव्हन दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान 19.2 षटकात पूर्ण केलं. प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आरसीबी संघासाठी ही मॅच जिंकणं महत्त्वाचं होतं. फाफ आणि विराटने आपल्या खेळीच्या जोरावर हे आव्हान पूर्ण केलं.
मुंबई : सनराइजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात आरसीबी संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना 187 धावांचं आव्हन दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान 19.2 षटकात पूर्ण केलं. प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आरसीबी संघासाठी ही मॅच जिंकणं महत्त्वाचं होतं. विराट कोहलीची 100 धावांची शतकी खेळी आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस याची 71 धावांची अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने या सामन्यात हैदराबाद संघावर दणदणीत विजय मिळवला.
आजच्या सामन्यात हैदराबाद संघाने हेनरिक क्लासेनच्या शतकाच्या जोरावर आरसीबीला 187 धावांचं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आरसीबीच्या वाघांनी हैदराबादच्या बॉलर्सची धुलाई केली. विराट आणि फाफ यांच्या बॅटींग स्टाईलवरून आज दोघे सामना जिंकवण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरल्याचं दिसत होतं.
फाफने सर्वात आधी अर्धशतक केलं त्यानंतर विराटने आपलं अर्धशतक केलं होतं. मात्र विराट कोहलीने अर्धशतक झाल्यानंतर जो काही टॉप गिअर टाकला तो शतक पूर्ण झाल्यावरच शांत झाला. विराटनेही शतक पूर्ण करताना सिक्स मारला. शतकानंतरही मोठा फटका खेळण्याच्या नादात विराट 100 धावांवर बाद झाला. त्यानंतर फाफही 71 धावांवर परतला. मात्र मॅक्सवेल आणि ब्रेसवेल यांनी राहिलेलं कां पूर्ण केलं आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह आरसीबी पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानी आली आहे.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (W), शाहबाज अहमद, मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज