SRH vs RCB : आरसीबीला प्ले-ऑफच्या तिकिटासाठी हैदराबादचं इतक्या धावांचं आव्हान
RCb हेनरिक क्लासेन याच्या आक्रमक शतकाच्या जोरावर सघांने आव्हानात्मक लक्ष्य आरसीबी संघासमोर ठेवलं आहे.
मुंबई : सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामधील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 186 धावा केल्या आहेत. हेनरिक क्लासेन याच्या आक्रमक शतकाच्या जोरावर सघांने आव्हानात्मक लक्ष्य आरसीबी संघासमोर ठेवलं आहे. बंगळुरूकडून ब्रेसवेलने सर्वाधिक 2 तर सिराज, शाहबाज आणि हर्षल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. आरसीबी संघाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे.
हेनरिक क्लासेनने 50 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं, 97 धावांवर असताना सिक्सर मारत शतकाला गवसणी घातली. शतक झाल्यावर 104 धावांवर असताना बोल्ड आऊट झाला. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. या शतकासह क्लासेन आयपीएलच्या 16 व्या मोसमात शतक करणारा सातवा फलंदाज तर हैदराबादकडून शतक करणारा चौथा फलंदाज ठरला आहे.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (W), शाहबाज अहमद, मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज