IPL 2023 SRH vs RR : राजस्थान संघाचा ‘रॉयल’ विजय, सनरायझर्स हैदराबादवर 72 धावांनी मात

राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल, जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर संघाने 200 पेक्षा जास्त धावांची मजल मारली. परंतु हैदराबाद संघाच्या कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.

IPL 2023 SRH vs RR : राजस्थान संघाचा 'रॉयल' विजय, सनरायझर्स हैदराबादवर 72 धावांनी मात
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 8:04 PM

मुंबई : आयपीएलमधील चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने 204 धावांचं लक्ष्य हैदराबाद संघाला दिलं होतं. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाला 131 धावाच करता आल्या. राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल, जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर संघाने 200 पेक्षा जास्त धावांची मजल मारली. परंतु हैदराबाद संघाच्या कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. युजवेंद्र चहलेने सर्वाधिकल 4 बळी घेतले, याचा परिणाम त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

बटलर-जयस्वालने रचला इतिहास

दोघांनी सलामीला येत राजस्थानसाठी आतापर्यंत पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा काढल्या आहेत. 85 धावा काढत बटलर आणि जयस्वालने ही कामगिरी केली आहे. याआधी 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध 81 धावा केल्या होत्या. 2008 मध्ये पॉवर प्लेमध्ये डेक्कन चार्जसविरूद्ध नाबाद 78 धावा केल्या होत्या.

हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यातून एकूण 6 जणांनी आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. हैदराबादकडून 4 आणि राजस्थानकडून 2 खेळाडूंना आयपीएलमध्ये पहिला वैयक्तिक सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.

हैदराबाद टीमसाठी आदिल रशिद, ग्लेन फिलिप्स, हॅरी ब्रूक आणि मयंक अग्रवाल या चौघांनी पदार्पण केलंय. तर राजस्थानकडून जेसन होल्डर आणि केएस आसिफ या जोडीचं डेब्यू सामना होता.

हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | भुवनेश्वर कुमार (कर्णधार), मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, फजलहक फारुकी, टी नटराजन, उमरान मलिक आणि आदिल रशीद.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन/विकेटकीपर), जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ आणि युजवेंद्र चहल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.