Umran Malik | उमरान मलिकची धार, देवदत्त पडीक्कल लाचार, डोळ्यांसमोर उडवला स्टंप
'जम्मू एक्सप्रेस'उमरान मलिक याने आयपीएल 16 व्या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादकडून राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळताना देवदत्त पडीक्कल याचा बुलेटस्पीडने स्टंप उडवला.
हैदराबाद | ‘जम्मू एक्सप्रेस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उमरान मलिक याने आयपीएल 15 व्या मोसमात आपली छाप सोडून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. बंदूकीतून गोळी निघते त्याच वेगाने उमरानने बॉलिंग केल्याने उमरान हा प्रकाशझोतात आला होता. आयपीएलच्या 15 व्या मोसमातील कामगिरीच्या जोरावर उमरानला टीम इंडियात संधी देण्यात आली होती. तिथेही त्याने आपला कारनामा सुरुच ठेवला होता. आता पुन्हा एकदा आयपीएलच्या 16 व्या हंगामात उमरानने आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी केली आहे. उमरानने आयपीएलच्या 16 व्या पर्वात सनरायजर्स हैदराबादकडून राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळताना शानदार कामगिरी केली. उमरानने राजस्थान विरुद्ध एकच विकेट घेतली. मात्र त्या एकमेव विकेटची चर्चा रंगली आहे.
उमरानने राजस्थानच्या देवदत्त पडीक्कल याला आऊट करत या मोसमातील पहिली विकेट घेतली. उमरानने देवदत्तला 149.2 KM/H च्या वायूवेगाने बॉल टाकत क्लिन बोल्ड केलं. उमरानने वेगाने टाकलेला बॉल देवदत्तला समजण्याआधीच स्टंप उडाला. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
राजस्थानने 14 ओव्हरमधअये 2 विकेट्स गमावून 151 धावा केल्या होत्या. मैदानात कॅप्टन संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी सेट झाली होती. ही जोडी फोडण्यासाठी हैदराबादचा कॅप्टन भुवनेश्वर कुमार याने उमरानला 15 वी ओव्हर टाकायला दिली.
उमरानकडून टप्प्यात कार्यक्रम
.@umran_malik_01 doing Umran Malik things! ?
Relive how he picked his first wicket of the #TATAIPL 2023 ?#SRHvRR | @SunRisers pic.twitter.com/QD0MoeW1vF
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
उमरानने भुवीचा विश्वास सार्थ ठरवला. उमरानने गूड लेंथवर टाकलेला बॉल देवदत्त डिफेंड करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र देवदत्तला समजण्याआधीच बॉल टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपवर जाऊन लागला आणि दांड्या गुल झाल्या. उमरानने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 1 विकेट घेत 32 धावा लुटवल्या.
6 जणांचं पदार्पण
दरम्या हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यातून एकूण 6 जणांनी आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. हैदराबादकडून 4 आणि राजस्थानकडून 2 खेळाडूंना आयपीएलमध्ये पहिला वैयक्तिक सामना खेळण्याची संधी मिळाली.
हैदराबाद टीमसाठी आदिल रशिद, ग्लेन फिलिप्स, हॅरी ब्रूक आणि मयंक अग्रवाल या चौघांनी पदार्पण केलंय. तर राजस्थानकडून जेसन होल्डर आणि केएस आसिफ या जोडीचं डेब्यू सामना आहे.
हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | भुवनेश्वर कुमार (कर्णधार), मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, फजलहक फारुकी, टी नटराजन, उमरान मलिक आणि आदिल रशीद.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन/विकेटकीपर), जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ आणि युजवेंद्र चहल.