IPL 2023 : ‘आता लोक कधीच बोलणार नाहीत की…’, शतकवीर सूर्याने पत्नीबाबतची ती गोष्ट बोलून दाखवलीच!

सूर्याच्या या खेळीने मुंबईने 200 पेक्षा जास्त धावांचं आव्हान गुजरातला दिलं होतं. या खेळीनंतर सूर्याने त्याची पत्नी देविशाबाबत एक किस्सा शेअर करत ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.

IPL 2023 : 'आता लोक कधीच बोलणार नाहीत की...', शतकवीर सूर्याने पत्नीबाबतची ती गोष्ट बोलून दाखवलीच!
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 9:24 PM

मुंबई : आयपीएलचा 57 वा सामना मुंबई इंडिअन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला होता. मुंबईच्या वानखेडे मैदानावर त्या दिवशी सूर्याचं वादळ सर्वांनी पाहिलं. सूर्यकुमार यादव याने आपलं पहिलं शतक ठोकलं होतं. सूर्याच्या या खेळीने मुंबईने 200 पेक्षा जास्त धावांचं आव्हान गुजरातला दिलं होतं. या खेळीनंतर सूर्याने त्याची पत्नी देविशाबाबत एक किस्सा शेअर करत ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.

काय म्हणाला सूर्या?

शतक केलं त्यावेळी कुटूंबाला पाहून मलाही बरं वाटलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देविशाला पाहून आनंद झाला. कारण याआधी शतके केलीत त्यावेळी त्या सामन्यांना मैदानामध्ये उपस्थित नव्हती. मात्र या शतकावेळी ती स्टेडियममध्ये होती, त्यामुळे लोकं आता बोलू शकणार नाहीत की देविशा मैदानात असल्यामुळे मला शतक करता आलं नाही, असं सूर्यकुमार यादवने म्हटलं आहे.

रोहितने केलं सूर्याचं कौतुक 

सूर्यकुमारकडे भरपूर आत्मविश्वास असून तो मागील सामन्यात जे काही झाले ते विसरतो. कधी कधी एखाद्या खेळाडूला अभिमान वाटतो की त्याने इतकी चांगली कामगिरी केली आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेले, पण सूर्या तसा अजिबात नाही. आणि गुजरातविरुद्धच्या विजयानंतर रोहित म्हणाला की त्याच्या दृष्टिकोनातून हा एक मनोरंजक सामना होता, असं रोहित शर्मा याने सांगितलं होतं.

सूर्याने अनेकवेळा 60 पेक्षा जास्त धावा केल्या मात्र त्याला शतक करता आलं नव्हतं. सूर्यकुमार 2011 पासून आयपीएल खेळतोय. 2012 मध्ये डेब्यू केला, 2013 मध्ये एकही मॅच खेळायला मिळालं नाही. पुढची सगळी वर्ष खेळला. टेक्निकली 12 वर्ष तो खेळतोय. सूर्यकुमार यादव याने शतक ठोकत मुंबई इंडियन्सची गेल्या 8 वर्षांची प्रतिक्षा संपवली. मुंबई इंडियन्सकडून तब्बल 8 वर्षांनंतर पहिल्यांदाच फलंदाजांने शतक ठोकलं.

दरम्यान, सूर्यकुमारने IPL 2023 च्या 12 सामन्यांमध्ये 190.83 च्या स्ट्राइक रेटने 479 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादवला गुजरात विरुद्धच्या 103 धावांच्या शतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.