IPL 2023 | धोनी याची टीम CSK वर बंदीची मागणी, तिकीटावरुन हंगामा, आयपीएलवरुन तामिळनाडूत हंगामा का?

| Updated on: Apr 11, 2023 | 11:55 PM

आयपीएल इतिहासातील सर्वात दुसरी यशस्वी टीम असेलल्या चेन्नई सुपर किंग्सवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. जाणून घ्या नक्की प्रकरण काय आहे.

IPL 2023 | धोनी याची टीम CSK वर बंदीची मागणी, तिकीटावरुन हंगामा, आयपीएलवरुन तामिळनाडूत हंगामा का?
Follow us on

तामिळनाडू | आयपीएल क्रिकेट टीमवरुन तामिळनाडू विधानसभेत राजकारण तापलंय. पीएमके पक्षाच्या आमदाराने मंगळवारी 11 एप्रिल रोजी विधानसभेत मुद्दा उपस्थित करत चेन्नई सुपर किंग्स टीमवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. चेन्नई टीममध्ये तामिळ खेळाडू नसल्याने बंदी घालावी अशी मागणी आहे. विधानसभेत चर्चेदरम्यान धर्मपुरी मतदारसंघाचे पीएमके पक्षाचे आमदार वेंकेटेश्वरन यांनी ही चेन्नई टीमवर बंदीची मागणी केली आहे.

चेन्नई टीमचा संबंध हा थेट तामिळनाडूसह आहे. पण टीमममध्ये तामिळ खेळाडूंना प्राधान्य देण्यात आलं नाही. तसेच तामिळनाडूचे खेळाडू टीममध्ये नाहीत, असा आरोप वेंकटेशन यांचा आहे. तसेच वेंकटेशन यांनी सीएसकेवर जाहिरात दिल्याचा आरोप केला आहे. आरोपानुसार, तामिळनाडूची एक टीम महसूल मिळवतेय मात्र राज्याचा एकही खेळाडू या टीममध्ये नाही.

टीममध्ये तामिळ खेळाडूंचा मुद्दा

“अनेकांनी मला सागंतिलंय. इथे खूप खेळाडू आहे. चेन्नई सुपर किंग्स या टीमसाठी तामिळनाडू हे घर आहे. मात्र चेन्नई टीम असं नाव असलेल्या संघात एकही स्थानिक खेळाडू नसणं हे दुर्देवी असल्याचं मला अनेक जणांनी लक्षात आणून दिलं. मी फक्त ही बाबत सदनात निदर्शनास आणून दिली.”, असं वेंकटेशन म्हणाले.

“मला सदनात मंत्र्यांकडून माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. मुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री योग्य कारवाई करतील असा मला विश्वास आहे. जर तामिळनाडूमध्ये जर स्थानिकांना प्राधान्य मिळालं नाही, तर त्यांना कुठेच प्राधान्य मिळणार नाही”, असंही वेंकटेशन यांनी नमूद केलं.