Sunil Gavaskar | आयपीएल नियमावरुन लिटील मास्टर यांची सटकली, नक्की काय झालं?

टीम इंडियाचे दिग्गज सुनील गावसकर हे कायम विविध विषयांवर आपलं मत मांडत असतात. त्यांनी अशाच एका विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sunil Gavaskar | आयपीएल नियमावरुन लिटील मास्टर यांची सटकली, नक्की काय झालं?
sunil gavaskar
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 11:13 PM

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमातील पहिला टप्पा हा संपला आहे. या हंगामात काही नव्या नियमांमुळे आतापर्यंत रंगत पाहायला मिळाली. या नियमाचा सर्वच संघानी भरभरुन फायदा घेतला. आपण बोलतोय ते इम्पॅक्ट प्लेअर या नियमाबाबत. टीम इंडियाचे दिग्गज सुनील गावसकर यांनी इमपॅक्ट प्लेअर या नियमावरुन संताप व्यक्त केला आहे. गावसकर कायम क्रिकेटमधील अनेक गोष्टींवर आपली प्रतिक्रिया देत असताच. मात्र गावसकर यांनी इमपॅक्ट प्लेअर नियमाबाबत जे म्हटलंय, ते ऐकून भल्या भल्यांना मिर्ची लागल्याशिवाय राहणार नाही.

इमपॅक्ट प्लेअर नियम

इमपॅक्ट प्लेअर हा नव्यानेच या मोसमात नियम आणला गेला. यानुसार, सामन्यादरम्यान दोन्ही संघ एक-एक खेळाडूला विश्रांती देऊन त्याच्या जागी दुसऱ्या राखीव खेळाडू मैदानात येतो. त्यासाठी टॉस दरम्यान दोन्ही खेळाडूंना आपल्या टीममधील 5 राखीव खेळाडूंच्या नावाची यादी दिली जाते. या नियमानुसार 11 ऐवजी 12 खेळाडू खेळू शकतात. या 12 व्या खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर म्हटलं जातं.

गावसकर यांचा संताप

फिल्डिंगशिवाय कोणत्याही खेळाडूने बॅटिंगसाठी येणं चुकीचं आहे.यामुळे तो खेळाडू बॅट्समन म्हणून यशस्वी होऊ शकत नाही, असं गावसकर याचं मत आहे. “विना फिल्डिंगशिवाय बॅटिंगसाठी येणं हे बॅटर म्हणून यशस्वी होण्याची लक्षणं नाहीत”, असं गावसकर यांनी स्पष्ट केलं. यावेळेस गावसकर यांनी काही उदाहरण दिलं. ज्यामध्ये त्यांनी अंबाती रायुडू याचं उदाहरण दिलं.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात गुरुवारी 27 एप्रिल रोजी सामना पार पडला. गावसकर यांनी या सामन्याचं उदाहरण देत रायुडूचा उल्लेख केला. “नो फिल्डिंग, नो स्कोअरिंग”. रायुडू राजस्थान विरुद्ध इमपॅक्ट प्लेअर म्हणून उतरला. मात्र रायुडूला भोपळाही फोडता आला नाही. यावरुन गावसकरांनी निशाणा साधला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.