GT vs CSK Final IPL 2023 : गुजरात टायटन्सला मिळणार सलग दुसऱ्यांदा जेतेपद, कसं ते जाणून घ्या
आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होत आहे. मात्र पावसाने हजेरी लावल्याने सामन्याबाबत संभ्रम आहे. पण याचा थेट फायदा गुजरात टायटन्सला फायदा होणार आहे.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेच्या जेतेपदासाठी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होत आहे. मात्र या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने सामना होईल की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यात गेल्या वर्षीचे नियम आणि यंदाचे नियम यात बराच फरक आहे. गेल्यावर्षी अंतिम फेरीत पावसामुळे काही आडकाठी आली तर एक दिवस राखीव ठेवण्यात आला होता. मात्र यंदा असा कोणताच नियम नाही. त्यामुळे त्याचा थेट फायदा गुजरात टायटन्सला होणार आहे. गुजरात टायटन्सनं गेल्या वर्षी जेतेपद जिंकलं होतं. यंदाही जेतेपदाची माळ गुजरातच्या गळ्यात पडेल असंच चित्र आहे. त्याचं कारण असं कारण 2023 आयपीएल स्पर्धेतील नियमावली..
पावसामुळे आजच्या दिवशी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना पावसामुळे झाला नाही तर राखीव दिवस नाही, अशी चर्चा आहे. पण खरंच तसं आहे की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. शेवटी पाऊस गेला तर पाच षटकांचा सामना खेळला जाईल. पण पाच षटकांचा सामना खेळणं शक्य झालं नाही तर सुपर ओव्हरमधून निर्णय जाहीर केला जाईल. असं असताना पावसामुळे सुपर ओव्हरचा खेळही झाला नाही तर मात्र गुजरात टायटन्सला विजयी घोषित करण्यात येईल. गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वल स्थानी असल्याने त्यांना हा मान मिळेल.
क्रिकबझच्या माहितीनुसार, राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आज सामना झाला नाही तर उद्या खेळवला जाईल. 9.35 पर्यंत सामना सुरु झाला तर मात्र 20 षटकांचा खेळ होईल. पण उशिर झाल्यास पाच षटकांचा सामना होईल. अन्यथा सुपर ओव्हर खेळवली जाईल. तेही शक्य झालं नाही तर उद्या सामना खेळवला जाईल.
आतापर्यंत गुजरात आणि चेन्नई हे दोन संघ दोन वेळा आमनेसामने आले आहेत. साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात गुजरातने चेन्नईला पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यानंतर क्वॉलिफायर 1 मध्ये चेन्नईने गुजरातला पराभूत करत पराभवाची परतफेड केली. चेन्नईने गुजरातला 62 धावांनी पराभवाची धूळ चारली. आता अंतिम फेरीत हे दोन संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत.
दोन्ही संघाची संपूर्ण स्क्वॉड
चेन्नईचा पूर्ण स्क्वॉड : एमएस धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.
गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.