IPL 2023 best strike rate : यंदाच्या सीझनमधील सर्वात 5 स्फोटक फलंदाज, एक बॉलही नाही सोडला!
IPL 2023 : क्रिकेटमधील टी-20 हा सर्वात वेगवान फॉरमॅट असून तोडफोड फलंदाजी पाहायला मिळते. 8 ते 9 चेंडूत 25 ते 30 धावांच्या आक्रमक खेळी केलेली दिसते. यंदाच्या आयपीएलमध्ये कमी चेंडूत स्फोटक खेळी करत दोनशेपेक्षा जास्त स्ट्राईकरेटने धावा केल्या आहे.
मुंबई : यंदाच्या आयपीएल 2023मध्ये अनकॅप खेळाडूंनी कमाल केली. कोटींंची बोली लावलेल्या खेळाडूंपेक्षा नवख्या पोरांनी यंदाचं पर्व गाजवलं. यामध्ये यशस्वी जयस्वाल, नेहल वढेरा, तिलक वर्मा, मोहसीन खान, साई सुदर्शन, अथर्व तायडे इ. खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. क्रिकेटमधील टी-20 हा सर्वात वेगवान फॉरमॅट असून तोडफोड फलंदाजी पाहायला मिळते. 8 ते 9 चेंडूत 25 ते 30 धावा ठोकलेल्या दिसतात. यंदाच्या आयपीएलमध्ये कमी चेंडूत स्फोटक खेळी करत दोनशेपेक्षा जास्त स्ट्राईकरेटने धावा केल्या आहे. या यादीमध्ये एक नंबरला जो खेळाडू त्याचं नाव पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.
गुजरात टायटन्सचा रशीद खान जगातील अव्वल फिरकीपटूंमध्ये गणला जातो. मुंबई इंडियन्सविरुद्ध एका सामन्यात नाबाद 89 धावा करणाऱ्या रशीदने या हंगामात एकूण 17 सामन्यांमध्ये केवळ नऊ वेळा फलंदाजी केली. ज्यामध्ये त्याने 216.66 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने 130 धावा केल्या. तो या यादीत अव्वल आहे.
दुखापतीतून परतलेल्या या ऑस्ट्रेलियन अष्टपैलूने गोलंदाजांचीही जोरदार धुलाई केली. त्याने मैदानाचा एकही कोपरा सोडला नाही जिथे त्याने षटकार आणि चौकार मारले नाहीत. 14 सामन्यात 400 धावा केल्या, आरसीबी हिरोचा स्ट्राइक रेट 183.48 होता.
चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधाराने या मोसमात 16 सामने खेळले. त्याने फक्त 12 वेळा फलंदाजी केली, त्यापैकी आठवेळा नाबाद राहिला. एकूण 100 धावा करूनही त्याचा स्ट्राईक रेट 182.45 वर पोहोचला आणि सर्वाधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या यादीत तो टॉप-3 मध्ये सामील झाला.
T20 क्रिकेटमध्ये फलंदाजी कशी करावी हे भारताचा खेळाडू देसी मिस्टर 360 ने दाखवून दिलं आहे. मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीचा हुकमी एक्का असलेल्या सूर्यकुमार यादवने 16 सामन्यांत एक शतक, पाच अर्धशतके आणि 182.13 च्या स्ट्राइक रेटसह 605 धावा केल्या.
सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या या न्यूझीलंडच्या यष्टीरक्षक फलंदाज ग्लेन फिलिप्सला फक्त पाच सामन्यांमध्ये संधी मिळाल्या असतील. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट हा 177 इतका होता.