मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत रोमहर्षक सामन्यांची मेजवानी क्रीडारसिकांना मिळत आहे. काही विजय तर तोंडात बोटं घालायला लावणारे आहेत. रिंकु सिंहने शेवटच्या षटकात सलग 5 षटकार मारून असाच विजय मिळवून दिला होता. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोण बाजी मारेल? सांगता येत नाही. असंच काहीसं सनराईजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स सामन्यात पाहायला मिळालं. राजस्थानने आक्रमक फलंदाजी करत 20 षटकात 2 गडी गमवून 214 धावा केल्या आणि विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान सनराईजर्स हैदराबादनं शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. पण सामना राजस्थाननं गमवला असला तरी विराट कोहलीची जखम मात्र ताजी झाली आहे.
राजस्थान रॉयल्स संघाचा 18 व्या षटकापर्यंत विजय निश्चित होता. पण शेवटच्या दोन षटकांमुळे सामन्याचं चित्रच पालटलं. हैदराबादच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहलीची आठवण क्रीडा रसिकांना पडली आहे. कारण असंच काहीसं विराट कोहलीसोबत झालं होतं.आजपासून 4042 दिवसांपूर्वी आरसीबीसोबत झालं होतं. या पराभवासाठी विराट कोहली जबाबदार होता.
12 एप्रिल 2012 रोजी म्हणजेच आजपासून 4042 दिवसांपूर्वी आरसीबीने राजस्थान-हैदराबादप्रमाणे सामना गमावला होता. समोर चेन्नई सुपर किंग्स संघ होता. त्यावेळेस चेन्नईला शेवटच्या दोन षटकात 43 धावा करायच्या होत्या. त्या वेळेस संघाची धुरा डेनियल विटोरीकडे होती. त्याने विराट कोहलीकडे 19 वं षटक सोपवलं.
विराट कोहलीच्या षटकाचा सामना करण्यासाठी समोर एल्बी मॉर्कल होता. त्याने विराटच्या षटकाची धुलाई केली. एका षटकात 28 धावा केल्या. विराटच्या षटकावर मॉर्कलने 3 षटकार आणि 2 चौकार ठोकले.
Who’s looking forward to @albiemorkel bringing the heat ??? 2012: Albie Morkel ransacked 28 runs off the first six balls he faced launching three sixes, two fours and ran a two! #bringtheheat #heatup pic.twitter.com/BvIQq0mUjB
— Durban Heat (@durban_heat) October 20, 2018
विराट कोहलीने महागडं षटक टाकल्यानंतर आरसीबीला 15 धावा वाचवायच्या होत्या. पण मार्कल आणि जडेजा जोडीने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. म्हणजेच आरसीबीने शेवटच्या 2 षटकात 43 धावा दिल्या. आयपीएलच नाही तर टी 20 क्रिकेटमधला हा विक्रम आहे.
आरसीबी व्यतिरिक्त टी 20 ब्लास्टमध्ये ग्लूस्टरशर आणि या हंगामात गुजरात टायटन्सने शेवटच्या दोन षटकात 43-43 धावा दिल्या होत्या. तर राजस्थान रॉयल्सने शेवटच्या दोन षटकात 41 धावा दिल्या.