IPL 2023 : विराट कोहली अशी जिंकायचा शर्यत, प्रशिक्षक आणि मित्राने केली पोलखोल Watch Video
IPL 2023 : आयपीएल स्पर्धेत दहा संघ सुपर फोरमध्ये स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा करत असताना विराट कोहलीचं नाव चर्चेत आहे. मग वाद असो की धावा विराटची चर्चा जोरदार आहे. आता त्याच्या प्रशिक्षकाने नवा खुलासा केला आहे.
मुंबई : क्रिकेट विश्वास विराट कोहलीची रनमशिन्स म्हणून ख्याती आहे. आपल्या बॅटने त्याने आतापर्यंत खोऱ्याने धावा केल्या आहेत. फिटनेससोबत आक्रमकता त्याच्या नसानसात भिनली आहे. मैदानात त्याच्या भावनांना आवर घालणं तर कठीण आहे. आपली आक्रमकता तो मनमोकळेपणाने जाहीर करतो. तर काही वादाचं कारणही ठरलं आहे. गौतम गंभीर आणि विराट कोहली हा वाद तर सर्वश्रूत आहे. दिल्लीकर असलेला विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत खेळत आहे. पण आता त्याचा संघाचा सामना दिल्लीशी होणार आहे.पण सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या बाबतीत नवनव्या गोष्टी समोर येत आहेत.
दिल्ली विरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी विराट कोहलीसोबत क्रिकेट खेळणाऱ्या एका मित्राने सांगितलं की, विराट कोहली दूधवाल्याच्या मदतीने शर्यतीत पहिला यायचा. त्याच्या सायकलवर बसून पहिला खेळाडूच्या पुढे उतरायचा आणि धावायचा.
विराट कोहलीचा मित्रांने सांगितलं की, प्रशिक्षक खेळाडूंना कायम धावण्याचा सराव करण्यास सांगायचे. अकादमीच्या बाहेर रस्त्यावरून धावायला सांगायचे. पाच किमी अंतर होतं. धावताना विराट कायम मागे असायचा. पण सायकलवरून दूध घेऊन जाणाऱ्या लोकांकडे लिफ्ट मागायचा. असं तो कायम करायचा. त्याला पुढे धावताना पाहून कोच राजकुमार शर्मा खूश व्हायचे.
Stories from Virat Kohli’s childhood in Delhi
We met Virat’s first coach Rajkumar Sharma, childhood friend Shalaj & his mother, and they tell us beautiful unheard anecdotes from Virat’s early days as a budding cricketer in Delhi, on @HombaleFilms brings to you Bold Diaries.… pic.twitter.com/wzbpeoTxfu
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 5, 2023
प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी सांगितलं की, क्रिकेट अकादमीत तो त्याच्या वयाच्या मुलांकडून कधी आऊट होत नव्हता. एक दिवस त्याने मोठ्या मुलांसोबत खेळण्याचा हट्ट धरला. मी रागाच्या भरात त्याला संधी दिली आणि त्याने चांगली बॅटिंग केली.
एक चेंडू त्याच्या छातीवर लागला. पण त्याने याबाबत कोणालाच सांगितलं नाही. घरी आईने बघितलं तेव्हा त्यांनी मला फोन करून सांगितलं की, त्याच्या वयाच्या मुलांसोबतच प्रॅक्टिस घ्या.
विराट कोहली आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासोबत आहे. मात्र एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. आयपीएल 2023 स्पर्धेत विराट चांगली फलंदाजी करत आहे. आता उर्वरित सामन्यांनंतर सुपर फोरचं गणित स्पष्ट होणार आहे. यंदा तरी जेतेपदावर नाव कोरणार का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ
बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.