Kohli vs Gambhir : विराट कोहली आणि गौतम गंभीर पुन्हा भिडणार? जाणून घ्या LSG विरुद्ध RCB सामना कधी ते

आयपीएल 2023 स्पर्धेत विराट कोहली विरुद्ध गौतम गंभीर हा वाद चांगलाच गाजला. साखळी फेरीत हे दोन संघ दोनदा आमनेसामने आले होते. पहिला सामना लखनऊने, तर दुसरा सामना आरसीबीने जिंकला होता. तिसऱ्यांदा पुन्हा सामना होण्याची शक्यता आहे.

Kohli vs Gambhir : विराट कोहली आणि गौतम गंभीर पुन्हा भिडणार? जाणून घ्या LSG विरुद्ध RCB सामना कधी ते
Kohli vs Gambhir : विराट आणि गंभीर यांच्यात पुन्हा वाद होण्याची शक्यता, कसं आणि कधी ते समजून घ्या
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 4:20 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धा गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्या वादामुळे सर्वाधिक चर्चेत राहिली. आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स् हे संघ दोन वेळा आमनेसामने आले होते. पहिल्या सामन्यात लखनऊन आरसीबीला शेवटच्या चेंडूवर पराभूत केलं होतं. यानंतर लखनऊच्या काही खेळाडूंनी विजयी उन्माद केला होता. इतकंच काय तर गौतम गंभीरने तोंडावर बोट ठेवून आरसीबीच्या चाहत्यांना गप्प बसण्यास सांगितलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीचा आक्रमक पवित्रा सर्वांनीच पाहिला. झेल घेतल्यानंतर प्रेक्षकांना पाहून गप्प बसण्याचा इशारा देखील केला. तसेच सामना जिंकल्यानंतर दोन्ही संघांमध्ये वाद रंगला होता. खासकरून विराट आणि गंभीरचं भांडण सर्वाधिक चर्चेत आलं होतं. आता हे दोन संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

पॉइंट टेबलमधील समीकरण पाहता आरसीबी आणि एलएसजी यांच्यात प्लेऑफचा सामना होऊ शकतो. राजस्थानला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने बंगळुरुला नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. बंगळुरुचा संघ पाचव्या स्थानावर आहे. तर 13 गुणांसह लखनऊचा संघ पाचव्या स्थानावर आहे.

बंगळुरुच्या विजयानंतर लखनऊने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये आरसीबी असं लिहिलं असून दोन इमोजी टाकले आहेत. यामुळे आरसीबीचे फॅन्स चांगलेच भडकले आहेत. आता कुठे प्रकरण शांत होत असताना लखनऊ फ्रेंचाईसीने त्याला हवा दिली आहे. बंगळुरुचा संघ आता एका गुणाने पिछाडीवर आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी दोन सामने उरले असून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे.

साखळी फेरीतील सामन्यात झालेल्या वादामुळे विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हकला दंड ठोठवण्यात आला होता. कोहली आणि गंभीर या दोघांना सामना फीच्या 100 टक्के रक्कम ठोठावण्यात आली होती. तर नवीन उल हकला सामना फीच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावली होती.

दोन्ही संघांचा संपूर्ण स्क्वॉड

बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, केदार जाधव, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.

लखनऊचा पूर्ण स्क्वॉड : केएल राहुल, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, आशुष बडोनी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौतम, करण शर्मा, कृणाल पंड्या, कायल मायर्स, मार्कस स्टोयनिस, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, रवि बिश्नोई, जयदेव उनादकट, यश ठाकुर, रोमारियो शेफर्ड, निकोलस पूरन, अमित मिश्रा, डॅनियल सैम्स, प्रेरक मांकड, स्वप्निल सिंह, नवीन उल हक, युद्धवीर सिंह.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.