Ruturaj Gaikwad Wedding | ऋतुराज गायकवाड या क्रिकेटरसोबत घेणार सप्तपदी, कोण आहे नवरी मुलगी?

टीम इंडियाचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा स्टार बॅट्समन ऋतुराज गायकवाड याला क्लिन बोल्ड करणारी उत्कर्षा पवार नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या.

Ruturaj Gaikwad Wedding | ऋतुराज गायकवाड या क्रिकेटरसोबत घेणार सप्तपदी, कोण आहे नवरी मुलगी?
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 11:34 PM

पुणे | चेन्नई सुपर किंग्स टीमने गुजरात टायटन्स टीमवर 30 मे रोजी आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईला पावसामुळे 15 षटकांमध्ये 171 धावांचं लक्ष्य मिळालं. रविंद्र जडेजााच्या जोरावर चेन्नईने हे आव्हान शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. या विजयात चेन्नईच्या सर्व गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याने 16 बॉलमध्ये 26 धावांची शानदार खेळी केली. ऋतुराजने या संपूर्ण मोसमात धमाकेदार कामगिरी केली.

आता आयपीएल जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू हे लंडनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी रवाना झाले. ऋतुराज गायकवाड पण जाणार होता. मात्र तो गेला नाही, कारण त्याचं लग्न. ऋतुराज लवकरच बोहल्यावर चढणार आहे. ऋतुराजचं लग्न येत्या जून महिन्यातील 3-4 जून दरम्यान होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र त्याची होणारी पत्नी कोण आहे, याबाबत अनेकांना उत्सूकता लागून आहे. ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीचं नाव हे उत्कर्षा पवार असं आहे. दोघेही आयपीएल फायनल जिंकल्यानंतर एकत्र दिसले. धोनीसोबत दोघांनी फोटोही काढला. मात्र ऋतुराजने रिलेशनशीपबाबत किंवा लग्नाबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

हे सुद्धा वाचा

कोण आहे उत्कर्षा पवार?

उत्कर्षा पवार ही सुद्धा क्रिकेटर आहे. उत्कर्षा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करते. उत्कर्षाने महाराष्ट्रासलाठी 2021 मध्ये लिस्ट ए सामने खेळले आहेत. मात्र त्यानंतर तिला खेळण्याची संधी मिळाली नाही. उत्कर्षा वयाच्या 11 व्या वर्षापासून क्रिकेट खेळतेय. उत्कर्षा ही पुणेकर आहे. उत्कर्षा ही अजून शिक्षण पुर्ण करतेय.

ऋतुराज गायकवाड याचं ट्विट

दरम्यान ऋतुराज गायकवाड हा चेन्नईचा स्टार ओपनर बॅट्समन आहे. ऋतुराजने चेन्नईसाठी काही मोसमांआधी ऑरेन्ज कॅपही जिंकली आहे. ऋतुराज चेन्नईकडून 2019 पासून खेळतोय. ऋतुराजला तेव्हा 20 लाख या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं होतं. तेव्हा ऋतुराज अपयशी ठरला. मात्र त्यानंतर ऋतुराजने सलग 3 अर्धशतक ठोकत आपण काय दर्जाचे फलंदाज आहोत, हे दाखवून दिलं.

ऋतुराजने 2021 मध्ये 16 सामन्यांत 635 धावा करत ऑरेन्ज कॅप मिळवली होती. तेव्हा सुद्धा चेन्नईने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. ऋतुराजने या 16 व्या हंगामात चेन्नईसाठी 590 धावा केल्या.

दरम्यान ऋतुराजची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी टीम इंडियाकडून राखीव खेळाडू म्हणून निवड झालेली. मात्र लग्नामुळे ऋतुराजला जाता येणार नाही. त्यामुळे ऋतुराजच्या जागी संघात यशस्वी जयस्वाल याला संधी देण्यात आली आहे.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...