Team India | टीम इंडियाला मोठा झटका,हा स्टार बॅट्समन आयपीएल आणि WTC Final मधून एकाचवेळी बाहेर

क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू हा आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर पडला आहे.

Team India | टीम इंडियाला मोठा झटका,हा स्टार बॅट्समन आयपीएल आणि WTC Final मधून एकाचवेळी बाहेर
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 5:04 PM

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात आता प्लेऑफ पात्रतेसाठी चढाओढ सुरु झालेली आहे. आयपीएल रायव्हलरीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. आयपीएल 16 व्या मोसमानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळणार आहे. या महामुकाबल्याचं आयोजन हे 7 ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्याचं आयोजन हे लंडनमधील द ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला मोजून 1 महिना बाकी असताना टीम इंडियासाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या स्टार विकेटकीपर बॅट्समन हा एकाच वेळी आयपीएल आणि वर्ल्ड चॅम्पियन फायनलमधून बाहेर पडला आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आणि टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल हा दुखापतीमुळे आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर पडला आहे. केएलने स्वत: सोशल मीडियावर विस्तृत पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. केएल एकाएकी बाहेर पडल्याने टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे.

केएल राहुल ‘आऊट’

केएल राहुल याला 1 मे रोजी लखनऊ विरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यान ही दुखापत झाली होती. केएल राहुल फिल्डिंगदरम्यान धावता धावता एकाएकी मैदानात कोसळला होता. आरसीबीच्या फाफ डु प्लेसिस याने मारलेला फटका बाउंड्री लाईनच्या दिशेने जाण्यापासून रोखण्यासाठी केएल वेगात धावत होता. मात्र या दरम्यान केएलला पायात दुखापत जाणवली आणि तो जागेवरच पडला. त्यानंतर केएल याला मैदानाबाहेर सहकाऱ्यांच्या मदतीने मैदानाबाहेर जावं लागलं होतं.

त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाची धुरा ही कृणाल पंड्या याला देण्यात आली आहे. केएलच्या दुखापतीनंतर तो आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये खेळण्यासाठी फिट होणार की नाही, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र केएलने फेसबूक पोस्ट करत या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.