IPL 2023 : रिकू सिंगने सलग पाच सिक्स मारलेल्या बॉलरचं दमदार कमबॅक, पहिल्याच ओव्हरमध्ये…

रिंकूच्या सलग पाच सिक्सरची अवघ्या क्रिकेट वर्तुळात चर्चा झाली होती. रिंकू सिंग सर्वांना इतका माहित नव्हता मात्र या पाच सिक्सरने तो रातोरात स्टार झाला. दुसरीकडे यश दयाल युवा खेळाडू खचून गेला होता, मात्र त्याने काही हार मानली नाही.

IPL 2023 : रिकू सिंगने सलग पाच सिक्स मारलेल्या बॉलरचं दमदार कमबॅक, पहिल्याच ओव्हरमध्ये...
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 7:12 PM

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स संघाचा खेळाडू रिंकू सिंग याने सलग पाच सिक्स मारत आपली वेगळी ओळख तयार केली आहे. गुजरात टायटन्स संघाच्या तोंडचा विजय रिंकूने आपल्या दमदार बॅटींगच्या जोरावर हिसकावला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये भावड्याने 5 सिक्सर मारत संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र विचार करा ज्या गोलंदाजाला त्याने हे सिक्स मारले होते त्याची मानसिक स्थिती कशी झाली असेल. करिअरला सुरूवात होण्याआधीच हा मोठा घात होता. ज्या गोलंदाजाला हे सिक्स मारले होते तो गुजरातचा यश दयाल होता.

या सामन्यानंतर यश आजारी पडला होता. इतकंच नाहीतर त्याचं वजनही 8 ते 9 किलोने कमी झाल्याचं हार्दिक पंड्याने सांगितलं होतं. 9 एप्रिलला यश द्यालने अखेरचा सामना खेळला होता. रिंकूच्या सलग पाच सिक्सरची अवघ्या क्रिकेट वर्तुळात चर्चा झाली होती. रिंकू सिंग सर्वांना इतका माहित नव्हता मात्र या पाच सिक्सरने तो रातोरात स्टार झाला. दुसरीकडे यश दयाल हा पूर्णपणे खचून गेला होता.

पठ्ठ्याने काही हार मानली नाही कारण तोसुद्धा देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये मुरलेला खेळाडू आहे. गुजरात टायटन्स आणि सनराईजर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यामध्ये यशने जोरदार कमबॅक केलं. यशने दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माला आऊट केलं. महत्त्वाच्या सामन्यात अभिषेक अवघ्या 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

यशने आपल्या शानदार गोलंदाजीने प्रभाव पाडला. पहिल्या दोन षटकात 18 धावांत 1 बळी घेतला. यशचे अप्रतिम पुनरागमन पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं. कोणत्याही खेळाडूसाठी कमबॅक करणं इतकंही सोप नसतं. मात्र गुजरातच्या या युवा गोलंदाजाने करून दाखवलं. या सामन्यानमध्ये विजय मिळवत गुजरात संघाने प्ले ऑफमध्ये आपलं स्थान पक्क केलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.